माजी न्या. सीएस कर्णन यांच्यावर गुन्हा

माजी न्या. सीएस कर्णन यांच्यावर गुन्हा

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालय व मद्रास उच्च न्यायालयातील काही न्यायाधीशांविरोधात, महिला कर्मचार्यांविरोधात अपशब्द वापरण्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे माज

कार्टूनिस्टवर बेअदबीची कारवाई करण्यास संमती
देशभरातील १५०० मान्यवर वकील भूषण यांच्या बरोबर
कुणाल कामरांवर बेअदबी कारवाईस परवानगी

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालय व मद्रास उच्च न्यायालयातील काही न्यायाधीशांविरोधात, महिला कर्मचार्यांविरोधात अपशब्द वापरण्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सीएस कर्णन यांच्याविरोधात चेन्नई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चेन्नईतील एका वकिलाने चेन्नई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, त्यानंतर कर्णन यांच्याविरोधात आयपीसी कलम १५३ व ५०९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

कर्णन यांच्याविरोधातली ही तक्रार सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडेही पाठवण्यात आली असून या तक्रारीत एका व्हीडिओचा उल्लेख आहे. या व्हीडिओमध्ये कर्णन महिलांच्याविरोधात अपशब्द बोलत असून काही न्यायाधीश व अधिकार्यांच्या पत्नींनाही ते धमकावत आहेत. त्याचबरोबर न्यायालयातल्या महिला कर्मचारी व महिला न्यायाधीशांचा सर्वोच्च न्यायालय व मद्रास उच्च न्यायालयातील काही न्यायाधीश लैंगिक छळ करत आहेत, याचाही खुलासा करत आहेत.

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी यापूर्वी २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने माजी न्या. कर्णन यांना दोषी ठरवले होते व त्यांना ६ महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला होता. देशाच्या न्यायालयीन इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला तुरुंगात पाठवण्याच्या घटनेची नोंद झाली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0