छत्तीसगढमध्ये गावकऱ्यांनी घेतली मुस्लिमविरोधी शपथ

छत्तीसगढमध्ये गावकऱ्यांनी घेतली मुस्लिमविरोधी शपथ

रायपूर: छत्तीसगढमधील सुर्गुजा जिल्ह्यातील एका खेड्यातील नागरिक मुस्लिमांशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवणार नाही अशी शपथ घेत आहेत असे दाखवणारा व्हिडिओ श

भाजप नेत्याच्या कार्यक्रमात चिथावणीखोर घोषणा
जंतरमंतर चिथावणीखोर घोषणा; ६ जणांना अटक
१०० कोटींवर १५ कोटी भारी पडतील : वारिस पठाणही बरळले

रायपूर: छत्तीसगढमधील सुर्गुजा जिल्ह्यातील एका खेड्यातील नागरिक मुस्लिमांशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवणार नाही अशी शपथ घेत आहेत असे दाखवणारा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाला असून, छत्तीसगढमधील यंत्रणेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या व्हिडिओमध्ये, मुस्लिमांशी कोणतेही आर्थिक व्यवहार करणार नाही, मुस्लिमांना जमीन विकणार नाही अशी शपथ घेताना काही लोक दिसत आहेत.

हा व्हिडिओ लुंद्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंडीकला गावात ५ जानेवारी रोजी चित्रित करण्यात आला आणि गुरुवारी तो समोर आला, असे समजते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गावाचा दौरा केला व चौकशी सुरू केली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी रोजी दोन खेड्यांमधील रहिवाशांमध्ये झालेल्या वादाचा परिणाम म्हणून हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे.

या व्हिडिओतील लोक पुढील आशयाची शपथ घेताना दिसत आहेत: “आम्ही हिंदू अशी शपथ घेतो की, आजपासून आम्ही मुस्लिम दुकानदारांकडून कोणतीही वस्तू खरेदी करणार नाही आणि त्यांना काहीही विकणार नाही. आमची जमीन मुस्लिमांना विकणार नाही, भाड्याने देणार नाही किंवा वापरायला देणार नाही. आमच्या गावात आलेल्या विक्रेत्याचा धर्म निश्चित कळल्यानंतरच आम्ही त्याच्याकडून वस्तू विकत घेऊ, अशी शपथ आम्ही हिंदू घेत आहोत. आम्ही मुस्लिमांसाठी मजुरीचे काम करणार नाही अशीही शपथ घेतो.”

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिकारी (एएसपी) आणि उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) यांनी गुरुवारी या गावाचा दौरा केला. त्यांनी या घटनेबद्दलचे तपशील जाणून घेतले, असे सुर्गुजचे जिल्हाधिकारी संजीव झा यांनी सांगितले. या प्रकरणात पुढील कारवाई केली जात आहे, असे ते म्हणाले.

“१ जानेवारी रोजी शेजारच्या बलरामपूर जिल्ह्यातील आरा गावाचे रहिवासी नववर्ष साजरे करण्यासाठी कुंडीकलामध्ये आले होते. त्यावेळी येथील रहिवाशांसोबत त्यांचे भांडण झाले,” असे सुर्गुजा येथील एएसपी विवेक शुक्ला यांनी सांगितले.

“दुसऱ्या दिवशी कुंडीकलाच्या एखा रहिवाशांने पोलिसांत तक्रार नोंदवली. त्याने तक्रारीत म्हटले आहे की, आराचे सहा गावकरी (हे सगळे विशिष्ट धर्माचे आहेत) माझ्या घरांत घुसले आणि त्यांनी माझ्या कुटुंबियांना मारहाण केली.”

या तक्रारीच्या आधारे सहा जणांना अटक करण्यात आली पण या सर्वांना स्थानिक न्यायालयाने त्याच दिवशी जामीन मंजूर केला, असे शुक्ला यांनी सांगितले.

प्राथमिक माहितीवरून असे दिसते की, या वादाचा फायदा घेऊन काही जणांनी कुंडीकलाच्या नागरिकांना सभा घेण्यास तसेच या सभेत विशिष्ट धर्माच्या लोकांविरोधात शपथ घेण्यास चिथावणी दिली, असेही शुक्ला यांनी सांगितले. जमावाला ही शपथ कोणी दिली हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही ते म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0