महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेकः ४० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेकः ४० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

मुंबईः महाराष्ट्र व राजधानी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचा उद्रेक दिसून आला. शुक्रवारच्या मागील २४ तासात कोरोनाचे ४०,९२५ नवे रुग्ण मिळाले असून यात एकट्या म

राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी
आजार शब्दांच्या खेळाचा
बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत २२ शवांना स्मशानात नेले

मुंबईः महाराष्ट्र व राजधानी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचा उद्रेक दिसून आला. शुक्रवारच्या मागील २४ तासात कोरोनाचे ४०,९२५ नवे रुग्ण मिळाले असून यात एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या २०,९७१ इतकी आहे. गुरुवारच्या आकडेवारीपेक्षा ८०० रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या २४ तासात मुंबईत ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर १,३९५ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले व ८८ रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागला. धारावीत कोरोनाचे संक्रमण वाढल्याचे दिसून येत आहेत. मुंबईत आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ८ लाख ७४ हजार रुग्ण एवढी नोंदली गेली आहे. मुंबईत सध्या ६५३१ कोरोना रुग्ण इस्पितळात उपचार घेत आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या २४ तासांत २० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला तर १४,२५६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात शुक्रवार अखेर १ लाख ४१ हजार ४९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०८ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ०१ लाख ४६ हजार ३२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६८ लाख ३४ हजार २२२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण ९.७४ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ७ लाख ४२ हजार ६८४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ४६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0