नवी दिल्लीः लडाखच्या पूर्वेचा पँगाँग त्सो सरोवरच्या दक्षिणेकडील प्रदेशात मंगळवारी भारत-चीन दरम्यान पुन्हा संघर्ष उफाळला असून भारताने प्रत्यक्ष ताबा रे
नवी दिल्लीः लडाखच्या पूर्वेचा पँगाँग त्सो सरोवरच्या दक्षिणेकडील प्रदेशात मंगळवारी भारत-चीन दरम्यान पुन्हा संघर्ष उफाळला असून भारताने प्रत्यक्ष ताबा रेषेवरील आपले सैन्य मागे घ्यावे असे चीनने भारताला सांगितले आहे. भारताने पुन्हा घुसखोरी केली असेही चीनचे म्हणणे आहे. सोमवारी भारताने आपल्या हद्दीत घुसखोरी करण्याचा चीनच्या सैन्याचा प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा केला होता. त्यानंतर मंगळवारी चीन व भारताचे सैन्य पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.
पँगाँग त्सो सरोवरच्या दक्षिणेकडील भाग हा भारत-चीनच्या दृष्टीने नवा वादग्रस्त प्रदेश बनला आहे. यापूर्वी गलवान नदीचे खोरे, पँगाँग त्सोच्या उत्तरेकडील भाग व डेप्सांग हे भाग उभय देशांमध्ये संघर्षाचे मुद्दे बनले होते.
सोमवारी भारताच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना चीनच्या परराष्ट्र खात्याने आक्रमक भाषा वापरली नव्हती. पण नंतर चीनच्या लष्कराने-पीपल्स लिबरेशन आर्मीने- आक्रमक स्वरुपाची भाषा वापरल्यानंतर मंगळवारी चीनच्या भारतातील दुतावासातील प्रवक्ते जी रोंग यांनी पीएलएची भाषा वापरली. त्यांनी भारताचेच सैन्य पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडील भागात अनेक ठिकाणी घुसल्याचा आरोप केला.
३१ ऑगस्ट रोजी भारत व चीनमधील पूर्वी झालेला सामंजस्य करार, सहमती तोडून भारताच्या सैन्याने प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून चीनच्या हद्दीत प्रवेश केला. भारताचे सैन्य पँगाँग सरोवरच्या दक्षिणेकडून रेकिन खिंडीच्या नजीक चीनच्या हद्दीत घुसले व त्यांनी आक्रमक अशा हालचाली केल्या, असे जी रोंग म्हणाले. भारताने सामंजस्य करार, सहमती व अन्य संकेत तोडत या प्रदेशातील शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेही रोंग म्हणाले. भारताने आपले सैन्य मागे घ्यावे अन्यथा प्रतिकाराला सामोरे जावे असाही रोंग यांनी इशारा दिला आहे.
मूळ बातमी
COMMENTS