भारतीय ठाण्यानजीक चीनचे शस्त्रसज्ज सैन्य तैनात

भारतीय ठाण्यानजीक चीनचे शस्त्रसज्ज सैन्य तैनात

नवी दिल्लीः लडाखमधील पँगाँग सरोवरच्या दक्षिणेकडील ज्या भागात भारतीय सैन्य तैनात करण्यात आले तेथेच चीनचे सैनिक हातात भाले, चाकू व बंदुका घेऊन सज्ज असल्

भारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प
३७० कलम रद्दचा निर्णय बेकायदाः चीन
मोदींचे मौन सुटले; राहुल गांधीचे ५ प्रश्न

नवी दिल्लीः लडाखमधील पँगाँग सरोवरच्या दक्षिणेकडील ज्या भागात भारतीय सैन्य तैनात करण्यात आले तेथेच चीनचे सैनिक हातात भाले, चाकू व बंदुका घेऊन सज्ज असल्याचे छायाचित्र एनडीटीव्हीने प्रसिद्ध केले आहे.

या छायाचित्रानुसार चीनच्या सैनिकांचा हेतू संघर्ष करण्याचा होता असे स्पष्टपणे दिसून येते. गेल्या १५ जून रोजी गलवान खोर्यात चीनच्या सैनिकांनी २० भारतीय जवानांना ठार मारले होते. त्यावेळी चिनी सैनिकांकडे रॉड, काठ्या, खिळे लावलेल्या लाठ्या, अणकुचीदार तारा आढळून आल्या होत्या.

आता मिळालेल्या या छायाचित्रावरून स्पष्ट दिसते की चीनचे प्रत्यक्ष ताबा रेषेवरील सैनिक शस्त्रसज्ज असून ते संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.

सोमवारी दक्षिण पँगाँगमधील रेचिन ला-रेजांग व मगर हिलच्यामध्ये भारत व चीनचे सैन्य शुटींग रेंजच्या आत होते. नंतर चीनचे सैन्य भारतीय सैन्यात ज्या भागात तैनात केले जात होते, तेथे आले. त्यावर भारतीय सैन्याने आक्षेप घेतला. चीनच्या सैनिकांना मागे फिरावे म्हणून आपली शस्त्रे दाखवली. त्यानंतर चीनच्या सैनिकांनी हवेत गोळीबार केला.

एनडीटीव्हीला मिळालेले हे छायाचित्र रेजांगा ला व मुखपारी या भारतीय हद्दीतील असून त्यात चिनी सैनिकांकडे चाकू, भाले व बंदुका दिसून आल्या आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0