‘नग्नते’चे कारण देत छायाचित्रांचे प्रदर्शन काढले

‘नग्नते’चे कारण देत छायाचित्रांचे प्रदर्शन काढले

छायाचित्रकार अक्षय माळी यांचे छायाचित्र प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी नगणतेचे कारण देऊन रंगमंदिराच्या व्यवस्थापनाने प्रदर्शन बंद करण्यास सांगितले.

संसदीय समितीमार्फत फेसबुकची चौकशी व्हावीः काँग्रेस
सातपाटील कुलवृत्तांत: काळाचा अजस्त्र पट उलगडणारी महाकादंबरी
पेट्रोल दरात ९.५० रु.तर डिझेलमध्ये ७ रु.ची कपात

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या आर्ट गॅलरीत छायाचित्रकाराच्या छायाचित्रांचे प्रदर्शन ‘नग्नते’चे कारण देत व्यवस्थापनाने काढून टाकले.

मानवी शरीर, नग्नता, मासिक पाळी आणि लैंगिकता या विषयावर अक्षय माळी यांच्या छायाचित्रांचे तीन दिवसीय प्रदर्शन शुक्रवारी (७ जानेवारी) जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले होते, मात्र ते ८ जानेवारी रोजी काढण्यास सांगण्यात आले होते.

बालगंधर्व रंगमंदिराचे प्रभारी व्यवस्थापक सुनील मते म्हणाले की, छायाचित्रकार अक्षय माळी यांनी प्रदर्शनाच्या विषयाची माहिती व्यवस्थापनाला अगोदरच सांगायला हवी होती. तसेच आम्ही त्यांना पोलिसांची परवानगी घ्यायला सांगितले होते. “कोणाच्याही भावना दुखावणाऱ्या अशा कोणत्याही प्रदर्शनाला आम्ही परवानगी देत ​​नाही. अशी नग्नता (आर्ट गॅलरीत) योग्य वाटत नाही.” असे मते म्हणाले.

२३ वर्षाचे अक्षय हे मूळचे सातारा येथील असून, त्यांनी सिंबायोसिस आर्ट मधून शिक्षण घेतले आहे. त्यांचे हे पहिलेच प्रदर्शन होते. छायाचित्रकार माळी म्हणाले, “प्रदर्शनाची थीम होती ‘इट्स मी’ ज्यामध्ये या प्रदर्शनात निसर्गाच्या सानिध्यात काढलेली माझी आणि इतर मॉडेल्सची नग्न छायाचित्रे होती.”

“जेव्हा मी स्लॉट बुक केला, तेव्हा मी व्यवस्थापनाला ‘न्यूड थीम’बद्दल सांगितले नव्हते. ऑनलाइन फोटोग्राफी प्रदर्शन असेल असे सांगून मी स्लॉट बुक केला होता, असे माळी यांनी सांगितले.

बालगंधर्व व्यवस्थापनाने ३ दिवसांच्या प्रदर्शनासाठी अक्षय यांच्याकडून ५ हजार ३०० रुपये शुल्क घेतले होते. मात्र प्रदर्शन केवळ दीड दिवसच होऊ शकले.

माळी म्हणाले, ‘मी पहिल्यांदाच एका आर्ट गॅलरीत माझी चित्रे दाखवत होतो, पण माझ्या कलाकृतींना असा विरोध झाला. कलेला कोणतेही नियम किंवा मर्यादा नसतात, परंतु ती एका विशिष्ट चौकटीत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0