यूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली

यूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली

सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने नियुक्त केलेल्या चार वरिष्ठ वकिलांच्या पॅनेलमध्ये भारताचे सरन्यायाधीश यूयू लळित यांचा मुलगा श्रीयश लळित यांचा समावेश करण्यात आला आहे.

लैंगिक छळणूकीबाबतच्या तरतुदींचा अभाव
देश कठीण परिस्थितीतून जातोय – सरन्यायाधीश
सुवर्ण पदक विजेत्या मुलीने सरन्यायाधीशांच्या हस्ते पदक घेणे नाकारले

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांचा मुलगा श्रीयश यू. लळित यांची उत्तर प्रदेश सरकारने सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी यूपी सरकारने नियुक्त केलेल्या वरिष्ठ वकिलांच्या पॅनेलचा ते एक भाग आहेत.

नवभारत टाइम्सच्या बातमीनुसार, शनिवारी योगी सरकारमधील विशेष सचिव निकुंज मित्तल यांनी एक अधिसूचना जारी केली. श्रीयश यांच्या व्यतिरिक्त यूपी सरकारने सुप्रीम कोर्टात आणखी तीन सरकारी वकिलांची नियुक्ती केली आहे.

हे उल्लेखनीय आहे की माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती लळित यांनी अलीकडेच सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते केवळ ७४ दिवस या पदावर राहतील आणि ८ नोव्हेंबर रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त होतील.

लळित यांच्या कुटुंबातील चार पिढ्या न्यायव्यवस्थेशी संबंधित आहेत. श्रीयशची पत्नीही वकील आहे.

यू यू लळित यांचे आजोबा उमेश रंगनाथ लळित हे सोलापूरमध्ये वकील होते. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी तेथे काम केले होते. सरन्यायाधीशांचे वडील उमेश लळित हे देखील पेशाने वकील आहेत. पुढे त्यांनी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले.

सरन्यायाधीश यांना दोन मुलगे आहेत. मोठा मुलगा श्रीयश याची यूपी सरकारने वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा धाकटा मुलगा हर्षद अमेरिकेत संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0