राज्यात ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

राज्यात ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मूल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’)

‘पतंजली’ला प्राप्तीकर खात्याकडून करसवलत
मुंबईत ५०० चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द
‘फेसलेस’ कर मूल्यांकन धोरणाचे अनावरण

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मूल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर १ एप्रिल २०२२ पासून १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे. महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) ३ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला आहे.

नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी ६० रुपये प्रति किलो तर पीएनजी ३६ रुपये प्रति एससीएम असेल, असे प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0