‘पतंजली’ला प्राप्तीकर खात्याकडून करसवलत

‘पतंजली’ला प्राप्तीकर खात्याकडून करसवलत

नवी दिल्लीः योगगुरू रामदेव बाबा यांची पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्ट ही संशोधन संस्था असल्याचे मान्य करत प्राप्तीकर खात्याने या ट्रस्टला मिळणार्या निधी

जनतेची दिशाभूल करू नयेः रामदेवबाबांना हायकोर्टाकडून समज
रामदेव बाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराःआयएमए
‘संभ्रम करणारा कोरोना विषाणूचा फोटो त्वरित हटवावा’

नवी दिल्लीः योगगुरू रामदेव बाबा यांची पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्ट ही संशोधन संस्था असल्याचे मान्य करत प्राप्तीकर खात्याने या ट्रस्टला मिळणार्या निधीवर येत्या ५ वर्षांसाठी करसवलत दिली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी)ने या संदर्भात एक अधिसूचना काढली असून २०२१-२२ ते २०२६-२७ या काळात पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्टला जेवढी देणगी वा दान स्वरुपात पैसे मिळतील त्यांना करमुक्त ठरवण्यात यावे, हा निर्णय सीबीडीटीच्या प्राप्तीकर कायदा ३५(१) (ii) अंतर्गत घेण्यात आल्याचे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. या अधिसूचनेत पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्ट, हरिद्वारला रिसर्च असोसिएशनच्या वर्गवारित समाविष्ट करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

या अगोदर प्राप्तीकर खात्याने ९ मार्च २०२१मध्ये उत्तर प्रदेशातील ग्रेटर नॉयडास्थित बेनेट विद्यापीठाला वैज्ञानिक संशोधन व सामाजिक शाखांमध्ये संशोधन व सांख्यिकी विद्यापीठाचा दर्जा देत करसवलतीचा लाभ दिला होता.

तर २८ जानेवारी २०२० इन्स्टिट्यूट ऑफ पेस्टिसाइड फॉर्म्युलेशन टेक्नॉलॉजी, गुरगांव व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंडियन स्कूल ऑफ माइन्स) धनबादला ३ जानेवारी २०२०मध्ये अशा प्रकारे करसवलत जाहीर केली होती.

पतंजलीची कोट्यवधींची उलाढाल

आयुर्वेद औषधांपासून दंतमंजन ते पीठ, नूडल्स अशा विविध उत्पादनांची निर्मिती व विक्री पतंजली उद्योग समूहाकडून केली जाते. या उद्योग समुहाने मंगळवारी २०२०-२१ या आर्थिक वर्षांत सुमारे ३० हजार कोटी रु.ची आर्थिक उलाढाल जाहीर केली असून यात रुची सोया मार्फत होणारी उलाढाल सुमारे १६,३१८ कोटी रु. इतकी आहे.

गेल्या वर्षी पतंजली समुहाने कर्जमुक्तीसाठी रुची सोया कंपनी ताब्यात घेतली होती. कंपनीचे संचालक रामदेव बाबा यांच्या मते येत्या ३-४ वर्षांत कंपनीला कर्जमुक्त करण्याचे प्रयत्न आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0