राज्यात सीएनजी स्वस्त, व्हॅटची १३.५ वरून ३ टक्क्यांपर्यंत कपात

राज्यात सीएनजी स्वस्त, व्हॅटची १३.५ वरून ३ टक्क्यांपर्यंत कपात

मुंबई: उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरून 

लेह काश्मीरमध्ये दाखवल्याप्रकरणी ट्विटरला नोटिस
अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना घरातच लस मिळणार
राज्यांत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

मुंबई: उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली. वित्त विभागाने शुक्रवार २५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे १ एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्त्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर १ एप्रिल २०२२ पासून लागू होतील.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0