नुपूर शर्मा, नवीन जिंदालमुळे परराष्ट्र खाते अडचणीत

नुपूर शर्मा, नवीन जिंदालमुळे परराष्ट्र खाते अडचणीत

नवी दिल्लीः भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा व भाजपचे मीडिया प्रभारी नवीन जिंदाल या दोघांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात टिपण्

मनपरिवर्तनः भाजप खासदाराचा राजीनामा मागे
‘आता चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवर’
दिल्लीत सरकार नायब राज्यपालांचेः नवे विधेयक

नवी दिल्लीः भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा व भाजपचे मीडिया प्रभारी नवीन जिंदाल या दोघांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात टिपण्णी केल्यानंतर रविवारी कतार, कुवेत व सौदी अरेबियाने भारतीय दुतावासाशी संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली आणि भारत सरकारला माफी मागण्यास सांगितले. या नंतर ओमानने भारतीय दुतावासाला उद्देशून एक पत्रक जाहीर केले. या पत्रकात भारतातून आलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता त्याच बरोबर भाजपने प्रवक्त्यांचे केलेल्या निलंबनाचे स्वागत करण्यात आले. ओमानचे परराष्ट्र खात्याचे सचिव शेख खलिफा बिन अली अल हार्दी यांनी भारतीय राजदूत अमित नारंग यांची भेट घेतली व त्यांना ओमानच्या भावना कळवल्या.

अशीच प्रतिक्रिया बहारिनमधूनही आली. बहारिनच्या परराष्ट्र खात्याने भाजप प्रवक्त्यांच्या हकालपट्टीचे स्वागत केले व सर्व धर्मांच्या श्रद्धा, संस्कृती, परंपरा, प्रतिके, व्यक्तिमत्वे यांचा आदर राखण्याचे आवाहन केले. बहारिनने आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून जारी केलेल्या पत्रकात आधुनिक जगाची मूल्य, सहिष्णुता व धर्माधर्मांमधील सुसंवादावर भर देण्याची गरज प्रकट केली. प्रतिगामी व कट्टरवादी शक्तींचा मुकाबला करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे, कट्टरवादातून देशद्रोह, धार्मिक उन्माद, कडवेपणा व वंशवादाला प्रोत्साहन मिळते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

रविवारी प. आशियातील देशांमधील भारतीय दुतावासांपुढे एकाएकी संकट उभे राहिले. कुवेत, कतार, इराणने त्यांच्या देशांमधील भारतीय राजदूतांना बोलावून घेतले व भाजप प्रवक्त्यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या प्रवक्त्यांवर कडक कारवाई करावी व माफी मागावी अशीही त्यांची मागणी केली. त्यानंतर कतारमधील भारतीय दुतावासाने नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांची नावे प्रत्यक्ष न घेता त्यांना समाज कंटक म्हणून संबोधले, या दोघांची प्रेषित पैगंबरांविषयीची मते ही भाजप व भारत सरकार यांची भूमिका नव्हे अशी सारवासारव त्यांना करावी लागली.

रविवारी रात्री सौदी अरेबिया, इस्लामिक देशांच्या संघटना, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांच्याही प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाल्या.

गल्फ कोऑपरेशन कौन्सिलनेही भाजपच्या प्रवक्त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत एक पत्रक जाहीर केले. या कौन्सिलमध्ये कुवेत, ओमान, बहारिन, यूएई, कतार, सौदी अरेबिया असे देश आहेत. गल्फ कौन्सिलचे सरचिटणीस डॉ. नायेफ फलाह एम अल हाजरफ यांनी भाजप प्रवक्त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. इजिप्तमध्ये इस्लामिक शिक्षण प्रसारातील एक महत्त्वाची जुनी संस्था अल अझहर अल शरीफनेही एक पत्रक जारी केले व भाजप प्रवक्त्याच्या विधानांचा निषेध केला.

कुवेतमध्ये सुपरमार्केटमध्ये भारतीय वस्तूंवर बंदी

नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्या प्रेषित पैगंबरावर केलेल्या अवमानजक टिपण्णीचा कुवेतमधील भारतीय वस्तूंच्या विक्रीवर परिणाम होताना दिसून आला. कुवेतमध्ये रविवारी भारतीय वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या अल अरिदिया कोऑप. सोसायटीच्या दुकानांमध्ये भारतीय मालास उचल देण्यास संबंधित दुकानाच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिला. या दुकानाबाहेर भारतीय तांदूळ, चहा, मसाल्याचे पदार्थ तसेच पोत्यांमध्ये पडून होते. या दुकानातून भारतीय वस्तू बाहेर पोत्यात भरून ठेवण्यात आल्या. आम्ही कुवेती मुस्लिम प्रे. पैगंबरांचा अवमान सहन करू शकत नाही असे या दुकानाचे सीईओ नासेर अल मुताईरि यांनी सांगितले.  

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0