प्रेषित पैगंबरांवर टिप्पण्णीः भाजपच्या आमदाराला अटक

प्रेषित पैगंबरांवर टिप्पण्णीः भाजपच्या आमदाराला अटक

हैदराबादः प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अवमानास्पद टिप्पण्णी करणाऱे भाजपचे आमदार टी. राजा सिंग यांना हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या अट

अजित पवारांच्या पाठींब्यातून मजबूत सरकार देणार : फडणवीस
काश्मीर – व्यापक कटाचा भाग
‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी; कुमारस्वामी सरकार गडगडले

हैदराबादः प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अवमानास्पद टिप्पण्णी करणाऱे भाजपचे आमदार टी. राजा सिंग यांना हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या अटकेनंतर भाजपने टी. राजा सिंग यांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी केली.

सोमवारी टी. राजा सिंग यांनी हास्यकलाकार मुनवर फारुखी याची टर उडवणारा १० मिनिटांचा व्हीडिओ यूट्यूब प्रसिद्ध केला होता. त्यात त्यांनी प्रेषितांवर अवमानास्पद विधाने केली होती. या विधानानंतर हैदराबादेत चारमिनार, भवानी नगर, मीर चौक व रैन बाजार या भागात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या व तेथून टी. राजा सिंग यांच्याविरोधात डाबिरपुरा पोलिस ठाण्यात फिर्यादी नोंद झाल्या. आपल्या व्हीडिओत टी. राजा सिंग यांनी मुनवर फारुकी हिंदू देवदेवतांवर का टीका करतोय, असा सवाल केला होता. फारुकी आमच्या राम, सीतेवर टीका करतो, त्यांची चेष्टा करतो, अशावेळी मी उत्तरादाखल काय करू शकतो, म्हणून मी त्याच्या आईवर कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला, हा माझा राग असल्याची टी. राजा सिंग यांची प्रतिक्रिया होती.

टी. राजा सिंग यांनी पोलिसांच्या कारवाईबाबतही प्रश्न विचारले आहेत. मला कोणत्या कारणाखाली अटक करण्यात आली आहे, हे समजत नाही. मी कोणत्याही धर्माचे वा समाजाचे नावही घेतलेले नाही. माझा व्हीडिओ हा फारुकीच्या विरोधात होता, त्याच्यावर केलेल्या मताशी आपण आजही ठाम आहोत, मी आता पहिला व्हीडिओ केला आहे, उद्या दुसराही व्हीडिओ करेन अशी धमकीही टी. राजा सिंग यांनी दिली आहे.

टी. राजा सिंग यांच्या अटकेबाबत पोलिसांनी सांगितले की, टी. राजा सिंग यांच्याविरोधात अनेक तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. पोलिसांनी टी. राजा सिंग यांचा यूट्यूबवरचा व्हीडिओ काढून टाकण्याचेही ठरवले आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या एक प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांविरोधात अवमानास्पद टिप्पण्णी केली होती, त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून संतापाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, त्यानंतर नुपूर शर्मा यांना पदावरून हटवण्यातही आले होते व सध्या त्यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे.

टी. राजा सिंग यांची पक्षातून हकालपट्टी

प्रेषित पैगंबर यांच्यावरची टिप्णण्णी नुपूर शर्मा यांना जशी भोवली तसेच टी. राजा सिंग यांच्याबाबतीतही घडले आणि त्यांना पक्षाच्या केंद्रीय समितीने तत्काळ पक्षातून निलंबित केले. शिवाय आपली भूमिका पक्षाच्या भूमिकेशी विसंगत असून त्या संदर्भात १० दिवसात स्पष्टीकरण द्यावे, यावर चौकशी होईल तोपर्यंत आपल्याला पक्षातून निलंबित करत असल्याचे पत्र भाजपने जाहीर काढले. भाजपचे केंद्रीय शिस्त समितीचे अध्यक्ष ओम पाठक यांनी हे पत्र जारी करत २ सप्टेंबर २०२२ पर्यंत आपले म्हणणे समितीपुढे मांडावे असेही टी. राजा सिंग यांना सांगण्यात आले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0