म. प्रदेशात गोहत्येच्या संशयावरून २ आदिवासींची जमावाकडून हत्या

म. प्रदेशात गोहत्येच्या संशयावरून २ आदिवासींची जमावाकडून हत्या

नवी दिल्लीः मध्य प्रदेशातील सेओनी जिल्ह्यात दोन आदिवासी युवकांना गोहत्या केल्याच्या संशयावरून जमावाने ठार मारले. हा जमाव बजरंग दलाचा होता असा आरोप काँ

कर्नाटकातील घोडे बाजार
‘अर्थव्यवस्थेतील समस्या दूर करण्याआधी त्यांची माहिती हवी’
महाराष्ट्रापेक्षा बिहारमध्ये दारुची विक्री अधिक

नवी दिल्लीः मध्य प्रदेशातील सेओनी जिल्ह्यात दोन आदिवासी युवकांना गोहत्या केल्याच्या संशयावरून जमावाने ठार मारले. हा जमाव बजरंग दलाचा होता असा आरोप काँग्रेसने केला असून पोलिसांनी २० जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या २० आरोपींमधील ६ जणांवर प्रत्यक्ष हत्या केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

हत्या करण्यात आलेल्यांची नावे संपत बत्ती व धनसा अशी असून जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ब्रजेश बत्ती यांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले व त्यांनी संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी २० जणांना अटक केली असून पीडिताच्या घरात १२ किलो मांस सापडल्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक एस. के. मारावी यांनी पीटीआयला सांगितले. घटनेत जखमी झालेल्या दोघांचा इस्पितळात नेताना मृत्यू झाल्या, एका जखमीला किरकोळ इजा झाल्याचे मारावी यांनी सांगितले. २० आरोपींवर गुन्हा कुराई पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे.

काँग्रेसची निदर्शने

दरम्यान ही घटना घडल्यानंतर स्थानिक आमदार काकोडिया यांनी धरणे धरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई अशी मागणी केली आहे, त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रु. देण्याचीही राज्य सरकारकडे मागणी केली आहे.

काँग्रेसने या प्रकरणाची उच्चस्तरिय समितीमार्फत चौकशी करावी अशीही मागणी केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार कमल नाथ यांनी गुन्हेगारांविरोधात सक्त कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0