राजस्थानात स्थानिक निवडणुकीत काँग्रेसचा दमदार विजय

राजस्थानात स्थानिक निवडणुकीत काँग्रेसचा दमदार विजय

जयपूर : राजस्थानमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत ४९ पैकी २३ स्थानिक स्वराज संस्था ताब्यात घेतल्या अ

देशाला आज आणखी अनेक नसिरुद्दीन शहांची गरज का आहे?
रणभूमीतील ‘पायलट’चे भरकटलेले उड्डाण
प्रधानमंत्री पीक विमा योजना धोक्यात

जयपूर : राजस्थानमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत ४९ पैकी २३ स्थानिक स्वराज संस्था ताब्यात घेतल्या असून भाजपला केवळ सहा ठिकाणी तर अन्य घटक पक्षांना २० ठिकाणी सत्ता मिळाली आहे.

या ४९ स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ३ महापालिका, १८ नगरपरिषदा व २८ नगरपालिकांचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यात ३३ जिल्ह्यांमधील ४९ स्वराजसंस्थांमधील २,१०५ वॉर्डसाठी निवडणुका झाल्या होत्या व सुमारे ७१.५३ टक्के एवढे मतदान झाले होते.

या निवडणुकींचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. त्यात काँग्रेसचे ९६१ उमेदवार, भाजपचे ७३७, बसपाचे १६ व माकपचे ३ आणि अपक्ष ३८६ उमेदवार निवडून आले.

काँग्रेसने जैसलमेर, बारमेर, हनुमान गड, सिरोही, बंसवारा येथे आघाडी घेतली तर भाजपने श्री गंगा नगर, अलवार व पुष्कर आपल्या ताब्यात ठेवले.

काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या राजस्थानात २०१९च्या लोकसभा निवडणुकांत सर्वच्या सर्व २५ लोकसभा जागा भाजपने जिंकल्याने मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना धक्का बसला होता. त्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकांतील काँग्रेसचे निर्भेळ यश महत्त्वाचे मानले जाते. काँग्रेसने हा विजय लोकांच्या अपेक्षांप्रमाणे आला असून सरकारने केलेल्या कामावर जनता समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: