काश्मीरमध्ये नामांतराचे प्रयत्न सुरू

काश्मीरमध्ये नामांतराचे प्रयत्न सुरू

श्रीनगर : काही दिवसांपूर्वी चेनानी-नाशरी बोगद्याला श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याची घोषणा झाली होती. त्याचबरोबर श्रीनगरमधील प्रसिद्ध अशा शेर-ए-

काश्मीरात व्हीपीएन वापरण्यावर यूएपीए कायद्याची अंमलबजावणी
‘काश्मीर : शैक्षणिक संस्थांमधील माध्यमबंदी उठवा’
काश्मीर : तीन महिन्यात १० हजार कोटींचे नुकसान

श्रीनगर : काही दिवसांपूर्वी चेनानी-नाशरी बोगद्याला श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याची घोषणा झाली होती. त्याचबरोबर श्रीनगरमधील प्रसिद्ध अशा शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमचे नाव सरदार वल्लभभाई पटेल असे बदलले जाणार असल्याचे वृत्त आले होते. आता काश्मीरमधील बहुतेक करून अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या दबावामुळे राज्य प्रशासनाला स्वीकारावे लागत असून त्याने काश्मीरमधील राजकीय वातावरण चिघळले जात आहे. हिंदू बहुसंख्याकवादाचे राजकारण काश्मीरमध्ये अशातऱ्हेने वेगळे पणाने खेळले जात असल्याने नामांतराचे राजकारण हा काश्मीरच्या राजकारणातील कळीचा मुद्दा बनणार आहे.

जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम रद्द झाल्यानंतर आणि २ ऑक्टोबरला जम्मू व काश्मीर हा नवा केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आल्यानंतर काश्मीरमधील विविध ठिकाणांची नावे बदलण्यासाठी केंद्रातील सत्तारुढ पक्ष भाजपकडून प्रयत्न होत आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. विशेषत: काश्मीरमध्ये ज्या ठिकाणांना शेख अब्दुल्ला यांचे नाव देण्यात आले आहे ती सर्व ठिकाणे, स्थळे निवडून त्यांचे नामांतर केले जाणार आहे. श्रीनगरमध्ये शेख अब्दुल्ला यांचे नाव दिलेली दोन हॉस्पिटल, एक क्रिकेट स्टेडियम, एक इनडोअर स्टेडियम, एक पार्क, कॉन्व्होकेशन सेंटर आहे तसेच खोऱ्यातही काही ठिकाणे आहेत. त्या सर्वांची नावे बदलण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

काश्मीरचे सिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेख अब्दुल्ला यांच्या राजकीय भूमिकेवर भाजपकडून नेहमीच टीका केली जात आहे. काश्मीरच्या जनतेवर शेख अब्दुल्ला यांच्या व्यक्तिमत्वाची असलेली मोहिनी व त्यांच्या पुढच्या पिढीचे काश्मीरच्या राजकारणात असलेले स्थान हे काश्मीरमधील महत्त्वाचे मानले जाते. अब्दुल्ला घराण्याचे हे महत्त्व कमी करण्याच्या हेतूने भाजप आपला हिंदू बहुसंख्याकवादाचा चेहरा काश्मीरवर थोपवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा नामांतरामुळे सामाजिक धुव्रीकरण तर होतेच शिवाय बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांवर विजय मिळवला आहे असेही त्यातून सूचित करायचा प्रयत्न असतो, असे मत श्रीनगरमधील इतिहासकार आशिक हुसेन व्यक्त करतात.

राज्य प्रशासनाने काही दिवसांपूर्वी काश्मीर सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी खात्याचे नामकरण जलशक्ती विभाग करावे या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. असे हिंदी नामकरण केलेला हा काश्मीरमधील पहिलाच विभाग आहे. पण हे नामकरण अशा परिस्थितीत केले जात आहे की जम्मू व काश्मीरची राजभाषा उर्दू ठेवावी की नाही याचा निर्णय अद्याप घेतला गेलेला नाही.

जम्मू व काश्मीर पुनर्रचना कायद्यातील कलम ४७नुसार जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेकडे त्यांची राज्यभाषा निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. या अधिकारात एखादे राज्य दोन भाषांनाही राज्यभाषेचा दर्जा देऊ शकते. काश्मीरात उर्दू व हिंदी या दोन भाषांना राज्यभाषेचा दर्जा मिळेल असे बोलले जात आहे.

आजपर्यंत काश्मीरमधील सरकारी खात्यांची, विभाग-उपविभागांची नावे उर्दू व इंग्रजी भाषेत लिहिली जात होती. त्याचबरोबर सरकारी अधिकारांचे स्वत:चे नाव व त्यांच्या पदांची नावे उर्दू व इंग्रजीत लिहिली जात होती. त्यातही बदल केले जाणार आहेत.

नॅशनल कॉन्फरन्स नाराज

भाजपच्या नामांतराच्या या मोहिमेमुळे नाराज नॅशनल कॉन्फरन्सने अशी नावे बदलून सामान्य काश्मीरी जनतेच्या भावनांशी, अस्मितांशी, स्वाभिमानाशी खेळले जात असल्याचा आरोप केला आहे. शेख अब्दुल्ला हे काश्मीरींच्या हृदयातील व्यक्तिमत्व आहे. या नेत्याने काश्मीरला बदलण्याचे कार्य केले होते आणि ते कोणी नाकारू शकत नाही, अशी प्रतिक्रिया या पक्षाने दिली आहे. काँग्रेसनेही अशा नामांतरावर प्रतिक्रिया देताना नावे बदलून काश्मीरचा इतिहास बदलता येत नाही असे भाजपला सुनावले आहे. शेख अब्दुल्ला हा काश्मीरच्या इतिहासाचा ठेवा आहे. आमची विचारधारा त्यांच्यापेक्षा वेगळी असेल पण त्यांचे आणि पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांचे जम्मू व काश्मीरच्या भारतातील सामीलकरणावर मधील योगदान नाकारता येत नाही असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

‘काश्मीर काही सल्तनत नाही’

काश्मीरमधील नामांतराच्या मोहिमेवर भाजप अधिक आक्रमक आहे. काश्मीर ही काही कुणाची सल्तनत नाही, या प्रदेशातील सर्व ठिकाणे, जागे या मुफ्ती व अब्दुल्लांना ठेका म्हणून दिल्या नाहीत असे भाजपचे म्हणणे आहे.

आताच काश्मीर हा नवा आहे आणि तो लोकशाही भारतातील प्रत्येक नेत्याचा भाग आहे. अशा भागात जर नेत्यांची (मुखर्जी –पटेल) नावे दिले नाहीत तर कुणाची देणार असा सवाल भाजपचे नेते खालिद जहांगीर विचारतात.

खालिद जहांगिर यांनी काही दिवसांपूर्वी गंदरबल येथील जम्मू व काश्मीर पोलिस प्रशिक्षण केंद्राचे नावही बदलण्याची विनंती केली होती. काश्मीरमधील नवी पहाट प्रस्थापित घराणेशाहीचा अंत करून उगवली आहे, असेही जहांगिर म्हणतात.

पण काश्मीरमधील डोग्रा समाजाची नावे बदलली जाणार नाहीत असेही जहांगिर स्पष्ट करतात. खोऱ्यातील एका हॉस्पिटलचे नाव तसेच एक बाजारपेठ, एक मोठा रस्ता महाराजा हरिसिंग यांच्या नावाचा आहे. श्रीनगर शहरात एसपी महाविद्यालयाचे नामांतर महाराजा प्रताप सिंग असे पूर्वीच झाले आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0