काँग्रेसमध्ये बदल : गुलाम नबी, खर्गे यांना हटवले

काँग्रेसमध्ये बदल : गुलाम नबी, खर्गे यांना हटवले

नवी दिल्लीः काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाची गरज आहे, असे पत्र पाठवणार्या यादीतील व पक्षातील सर्वात अनुभवी व ज्येष्ठ समजल्या जाणार्या काही नेत्यांना महासचि

आनंद शर्मा यांचा हिमाचल काँग्रेस सुकाणू समितीचा राजीनामा
पक्षात परिवर्तन हवे; २३ नेत्यांचे सोनियांना पत्र
शिवराजसिंह यांना ज्योतिरादित्यांचेच आव्हान

नवी दिल्लीः काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाची गरज आहे, असे पत्र पाठवणार्या यादीतील व पक्षातील सर्वात अनुभवी व ज्येष्ठ समजल्या जाणार्या काही नेत्यांना महासचिवपदावरून शुक्रवारी हटवण्यात आले. यामध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे यांची नावे असून त्यांच्या जागी अजय माकन व रणदीप सुरजेवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गुलाम नबी आझाद काँग्रेस कार्यकारिणी समितीचे सदस्य राहतील.

हटवण्यात आलेल्या ज्येष्ठांच्या यादीत मोतीलाल व्होरा, अंबिका सोनी, ल्युई फालेरो यांचाही समावेश आहे. असंतुष्ट नेत्यांमधील जितीन प्रसाद यांना कायमस्वरुपी निमंत्रित म्हणून नेमण्यात आले आहे. पण त्यांना महासचिव करण्यात आले आहे. त्यांच्याकडचे उ. प्रदेशचे प्रभारी पद काढून घेण्यात आले असून त्यांना बंगालचे प्रभारीपद देण्यात आले आहे.

या नेत्यांना हटवताना पक्षाने एक पत्र प्रसिद्ध केले असून गुलाम नबी आझाद, मोतीलाल व्होरा, अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खर्गे, ल्युइजिन्हो फालेरो या नेत्यांचे पक्षातील बहुमूल्य योगदानाबाबत आभारही मानले आहेत.

रणदीप सुरजेवाला यांना पक्षाला सल्ला देणार्या ६ सदस्यांच्या समितीत स्थान देण्यात आले आहे. सुरजेवाला हे राहुल गांधी यांच्या निकटचे समजले जातात. आता त्यांच्याकडे कर्नाटकचे प्रभारीपद देण्यात आले आहे. मुकुल वासनिक यांच्याकडे म. प्रदेशचे, हरीश रावत यांच्याकडे पंजाब, ओमान चंडी यांच्याकडे आंध्र प्रदेश, तारीक अन्वर यांच्याकडे केरळ आणि लक्षद्वीपची, जितेंद्र सिंह यांच्याकडे आसाम, तर अजय माकन यांच्याकडे राजस्थानचे प्रभारीपद देण्यात आले आहे.

मधुसूदन मिस्त्री यांना केंद्रीय निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी, तर के. सी. वेणुगोपाळ यांना संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे.

नव्या काँग्रेस कार्यकारणी समितीच्या सदस्यपदी दिग्विजय सिंह, राजीव शुक्ला, मनिकम टागोर, प्रमोद तिवारी, जयराम रमेश, एच. के. पाटील, सलमान खुर्शीद, पवन बंसल, दिनेश कुंदुरो, मनीष चतरथ आणि कुलजीत नागरा यांचा समावेश करण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0