‘बाबरीचा निकाल बिलकुल योग्य नाही’

‘बाबरीचा निकाल बिलकुल योग्य नाही’

नवी दिल्लीः बाबरी मशीद प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने झाला असून तो निर्णय बिलकुल योग्य नाही असे मत काँग्रेसचे न

देशाच्या भवितव्यासाठी अयोध्या निकालाचा अर्थ काय ?
इतिहासात वैश्विकदृष्टी मांडणारा अभ्यासक
बाबरी कटाचा अविश्वसनीय निकाल

नवी दिल्लीः बाबरी मशीद प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने झाला असून तो निर्णय बिलकुल योग्य नाही असे मत काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी बुधवारी व्यक्त केले.

काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराइज ओव्हर अयोध्याः नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान भाषणात चिदंबरम यांनी हे मत व्यक्त केले.

ते म्हणाले, आज आपण अशा काळात राहात आहोत की झुंडशाहीचा साधा विरोधही आपले पंतप्रधान व गृहमंत्र्यांकडून होत नाही. एक हिंदू तरुणी मुस्लिम कुटुंबात आनंदात राहात असल्याची जाहिरातही मागे घ्यायला लागते. आपला देश भलेही धर्मनिरपेक्ष असला तरी या धर्मनिरपेक्षतेवर रोजच हल्ले चढवले जात आहे. राज्य घटनेतील आत्म्यावर हल्ले चढवले जात आहे. राज्यघटनेला रोज अस्थिर, कमकुवत केले जात आहे, पण त्या विरोधात आज कोणी आवाज उठवत नाही, असे चिदंबरम म्हणाले.

अयोध्या प्रकरणाचा निकाल अशा काळात आला आहे, असे म्हणत चिदंबरम यांनी बाबरी प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे व क्लिष्ट होते. पण दोन्ही पक्षकारांनी न्यायालयाचा तोडगा स्वीकारला, म्हणून तो योग्य तोडगा आहे. पण न्यायालयाचा तोडगा योग्य आहे म्हणून दोघा पक्षकारांनी तो स्वीकारला असे नाही, याकडे लक्ष वेधले.

चिदंबरम यांनी ६ डिसेंबर १९९२मध्ये झालेला बाबरी विध्वंस हा देशाच्या राज्य घटनेला लागलेला कलंक असून ही घटना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी व दोन्ही धर्मांमध्ये दरी निर्माण करणारी ठरली, असे म्हटले. या घटनेतील आरोपींना निर्दोष मुक्त केले. जसे जेसिका लाल हत्याकांडात जेसिकाला कोणी ठार मारले हे सिद्ध झाले नाही तसे बाबरी मशीद कोणी पाडली हे सिद्ध झाले नाही. ही घटना आपल्या सर्वांच्या मानगुटीवर बसणारी आहे. गांधी-नेहरु-पटेल-मौलाना आझाद यांच्या देशामध्ये ही शरम आणणारी घटना घडली. ‘नो बडी डिमोलिश्ड बाबरी मस्जिद’ असे खेदजनक विचार चिदंबरम यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही आपले विचार व्यक्त केले. सिंह यांनी भाजप व संघपरिवारावर टीका करताना यांच्याकडून फोडा व राज्य करा अशा नीतीचा वापर केला जात असल्याचा आरोप केला. हिंदुत्व शब्दाचा हिंदू धर्म व सनातनी परंपरांशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्ट करत हिंदू खतरे में है, चा प्रचार करत संघ परिवार व भाजप देशात फुटीचे राजकारण करत असून या देशात इस्लामी व ब्रिटिशांची राजवट येऊनही हिंदू धर्म तगून असल्याचे मत व्यक्त केले.

भाजप नेते अडवाणी यांची रथयात्रा देशात फूट पाडणारी होती, या यात्रेमुळे देशात मत्सर, दुहीचे बीज पेरले गेले, असा आरोप सिंग यांनी केला.

दिग्विजय सिंह यांनी वि. दा. सावरकर हे धार्मिक नव्हते असेही म्हटले. सावरकर गायीला माता मानत नव्हते, त्यांनी हिंदू शब्दाची व्याख्या करताना हिंदुत्व हा शब्द आणला, त्याने समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला. संघ परिवार अफवा पसरवण्यात तरबेज आहे. आता सोशल मीडिया त्यांच्या साथीला आहे, असाही टोला सिंह यांनी मारला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0