लोकशाहीत हस्तक्षेपः काँग्रेसचे झुकरबर्गला पत्र

लोकशाहीत हस्तक्षेपः काँग्रेसचे झुकरबर्गला पत्र

नवी दिल्लीः भाजपाच्या द्वेषयुक्त प्रचाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणार्या फेसबुकच्या भारतीय अधिकार्यावर अमेरिकेतील ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने केलेले आरोप अत

फेसबुकच्या आंखी दास यांची पोलिसांत तक्रार
‘फेसबुक इंडिया’च्या आंखी दास यांचा राजीनामा
फेसबुकच्या आँखी दास यांच्याकडून मोदींना थेट मदत

नवी दिल्लीः भाजपाच्या द्वेषयुक्त प्रचाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणार्या फेसबुकच्या भारतीय अधिकार्यावर अमेरिकेतील ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने केलेले आरोप अतिशय गंभीर व भयंकर असून फेसबुकचे भारतातील कार्यालय भारताच्या लोकशाहीमध्ये हस्तक्षेप करत असल्यासंदर्भातील पत्र काँग्रेसने फेसबुकचे संस्थापक व सीईओ मार्क झुकरबर्ग यांना मंगळवारी पाठवले आहे.

दोन दिवसांपूर्वी, भारतातील आपल्या व्यवसायाला धोका होऊ नये म्हणून भाजपचे नेते, हिंदू राष्ट्रवादी गट यांना सोशल मीडियाचे द्वेषपूर्ण भाषणाची नियमावली लावण्यास फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ अधिकारी आंखी दास यांनी विरोध केल्याचे वृत्त अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केले होते. त्यावर मोठा गदारोळ माजला आहे.

त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी हे पत्र लिहिले असून या पत्रात काँग्रेसने फेसबुकच्या भारतीय कार्यालयातील अधिकार्यांची चौकशी केली जावी, कंपनीने सध्या कार्यरत असणार्या टीमला हटवून तेथे नवी टीम आणावी व दोषींची अंतर्गत चौकशी करावी, असे नमूद केले आहे. या चौकशीतून जे काही सत्य बाहेर येईल, ते सार्वजनिक करावे असेही वेणुगोपाल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये ज्या वृत्ताचा उल्लेख आला होता, ते वृत्त लगेचच हटवण्यात आले, याचा अर्थ फेसबुकला आपली चूक लक्षात आली असून भाजपसोबतचे संबंध कंपनीने स्पष्ट करावे असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. भारताची लोकशाही बळकट व्हावी म्हणून काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी त्याग केला आहे, त्यांच्या त्यागाचे, कार्याचे फेसबुक अवमूल्यन करत असेल तर तो भारतीय लोकशाहीतील हस्तक्षेप आहे, असे वेणुगोपाल यांनी पत्रात नमूद केले आहे.

फेसबुक व त्यांच्या मालकीची दुसरी कंपनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून द्वेषयुक्त माहिती पसरवली जात असल्याबद्दल पूर्वीही काँग्रेसने आक्षेप घेतले होते. या कंपन्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारीही केल्या होत्या पण त्याबाबत कोणतीही हालचाल कंपनीकडून झाली नाही, याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

मूळ विषय काय?

भाजपचे तेलंगणचे आमदार टी राजा सिंह यांच्या द्वेषपूर्ण भाषणाचा उल्लेख होता. हे आमदार धर्मांध भाषणे व वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याविरोधात आंखी दास यांनी फेसबुकने निर्धारित केलेली चिथावणीखोर भाषणांविरोधातील नियमावली लावू नये अशी भूमिका घेतली होती.

भाजपचे तेलंगणचे आमदार टी राजा सिंह यांच्या द्वेषपूर्ण भाषणाचा उल्लेख होता. हे आमदार धर्मांध भाषणे व वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याविरोधात आंखी दास यांनी फेसबुकने निर्धारित केलेली चिथावणीखोर भाषणांविरोधातील नियमावली लावू नये अशी भूमिका घेतली होती.

“मोदी यांच्या पक्षातील नेत्यांच्या विरोधात कारवाई केल्यास त्याचा फेसबुकच्या भारतातील व्यवसाय संधींवर परिणाम होऊ शकेल, असे फेसबुकच्या वतीने भारत सरकारबरोबर लॉबींग करण्याची जबाबदारी असणाऱ्या दास यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितल्याचे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिले होते. हे वृत्त फेसबुकच्या काही माजी व आजी कर्मचार्यांच्या हवाल्याने देण्यात आले होते.

आंखी दास यांच्याविरोधात तक्रार

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये पत्रकार आवेश तिवारी यांनी फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी डायरेक्टर आंखी दास यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार नोंद केली आहे. आंखी दास व त्यांच्या टीमकडून देशात हिंदू-मुस्लिम धार्मिक तेढ, द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप तिवारी यांनी आपल्या फिर्यादीत दाखल केला आहे.

तिवारी यांच्या फिर्यादीला उत्तर म्हणून आंखी दास यांनी तिवारी यांच्याविरोधात त्यांना जीवे मारल्याची धमकी ट्विटरवरून दिली जात असल्याबाबत दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार नोंद केली आहे.

दिल्ली पोलिसांचा तपास सुरू

दरम्यान रविवारी आंखी दास यांनी पोलिसांना काही ट्विटर अकाउंटवरून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे सांगितले. पोलिसांनी या संदर्भात फिर्याद नोंदवून घेतलेली नाही पण त्यांनी तक्रारीवरून तपास सुरू केला आहे.

दिल्ली विधानसभा समिती दास यांना बोलावणार

दिल्ली विधानसभेतील शांतता व सौहार्द समितीने सोमवारी फेसबुकच्या अधिकार्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल असे सांगितले. फेब्रुवारी महिन्यात दिल्ली दंगल भडकण्यात अन्य घटनांबरोबर सोशल मीडियातील फेक न्यूजचा भाग होता. यात फेसबुकचा किती नाकर्तेपणा वा दुर्लक्षपणा आहे याची चौकशी आंखी दास व अन्य सहकार्यांना समितीपुढे बोलावून केली जाईल, असे आम आदमी पार्टीचे आमदार राघव चढ्ढा यांनी सांगितले. समाजात चिथावणीखोर माहिती व फेक न्यूज पसरवण्यात फेसबुकचा वाटा असल्याच्या अनेक तक्रारी दिल्ली सरकारकडे आल्या आहेत, असे चढ्ढा म्हणाले.

संसदीय समितीही फेसबुकच्या अधिकार्यांना बोलावणार?

दरम्यान वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये आलेल्या वृत्ताची शहानिशा करण्यासाठी फेसबुकच्या अधिकार्याना बोलावण्याबाबत विचार केला जात असल्याचे संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0