कोरोना काळात अब्जाधिशांच्या संपत्तीत वाढ

कोरोना काळात अब्जाधिशांच्या संपत्तीत वाढ

नवी दिल्लीः कोरोना महासाथीच्या एप्रिल ते जुलै या ४ महिन्यांत भारतातल्या अब्जाधिशांच्या संपत्तीत ३५ टक्क्याने वाढ होऊन ती ४२३ अब्ज डॉलर झाल्याची माहिती

आसामात ‘एनआरसी’, केरळात ‘न्याय’!
जम्मू-काश्मीरात १२ लाख नागरिकांना रहिवासी प्रमाणपत्र
श्रमिकांचे आद्य नेते – नारायण मेघाजी लोखंडे

नवी दिल्लीः कोरोना महासाथीच्या एप्रिल ते जुलै या ४ महिन्यांत भारतातल्या अब्जाधिशांच्या संपत्तीत ३५ टक्क्याने वाढ होऊन ती ४२३ अब्ज डॉलर झाल्याची माहिती  Billionaires Insights Report 2020 ने दिली आहे.

२००९ पासून ३१ जुलै २०२०पर्यंत भारतातल्या अब्जाधिशांच्या संपत्तीत ९० टक्के वाढ झाली असून अमेरिका, चीन, जर्मनी, रशिया, फ्रान्स या देशांतील अब्जाधिशांच्या संख्येनंतर भारताचा क्रमांक येतो.

२००९ ते २०२०पर्यंत रशियातील अब्जाधिशांच्या संख्येच्या तुलनेत भारतातील अब्जाधिशांच्या संपत्तीत ८० टक्के वाढ होऊन ती ४६७.६ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

या महिन्याच्या सुरूवातीला Forbes’ India Rich List 2020 ने जारी केलेल्या अब्जाधिशांच्या यादीत रिलायन्स समुहाचे संचालक मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षाच्या तुलनेत ७३ टक्क्याने वाढ होऊन ती ८९ अब्ज डॉलर (६.५२ लाख कोटी रु.) इतकी झाली आहे. मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांच्या अन्य उद्योजक गौतम अदानी यांची संपत्ती २५.२ अब्ज डॉलर इतकी आहे. त्यानंतर एचसीएलचे शिव नाडर, सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ सायरस पुनावाला, बायकॉनच्या व्यवस्थापकीय संचालक किरण मुझुमदार शॉ यांची नावे आहेत.

Bloomberg Billionaires Index च्या मते रिलायन्सचे मुकेश अंबानी हे जगातल्या पहिल्या १० श्रीमंत व्यक्तींमध्ये असून ते आशिया खंडातील एकमेव उद्योजक आहेत.

आर्थिक मंदीच्या काळातही जगातील अनेक श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत घट झाली असतानाही भारतात मात्र उलटी परिस्थिती दिसून आली आहे.

फोर्ब्जच्या नुसार, भारतातील ४२.५ टक्के लोकसंख्येकडे असलेली एकूण संपत्ती ही देशातील १ टक्के श्रीमंतांकडे आहे. तर अन्य ५० टक्के लोकसंख्येकडे देशातील एकूण संपत्तीपैकी केवळ २.८ टक्के संपत्ती आहे. ऑक्सफॅमच्या अहवालात देशातील १० टक्के व्यक्तींकडे देशाची ७४ टक्के संपत्ती आहे. तर अन्य ९० टक्के जणांकडे केवळ २५.७ टक्के संपत्ती आहे.

Hurun India list नुसार २०१९ मध्ये भारतातील ८२८ धनाढ्यांकडे १०.२९ लाख कोटी रु. संपत्ती होती पण एका वर्षांत या धनाढ्यांकडील संपत्ती वाढून ती ६०.५९ लाख कोटी रु. इतकी झाली आहे. ही संपत्ती वाढण्यामागचे एक कारण असे की या काळात रिलायन्स इंडस्ट्रीचे समभाग वधारत होते.

धनाढ्यांची समाजसेवा

कोरोना महासाथीच्या काळात देशातील ९ अब्जाधिशांनी समाजसेवा म्हणून आर्थिक मदत दिली आहे. मुकेश अंबानी यांनी पीएम केअरसाटी ५०० कोटी रु. दिले असून ५ कोटी रु. महाराष्ट्र व गुजरातमधील मुख्यमंत्री निधीला दिले आहेत. त्याचबरोबर मुंबईत कोरोना रुग्णांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयातील १०० खाट दिल्या आहेत.

अझीम प्रेमजी यांनी कोविड मदत म्हणून १३२ दशलक्ष डॉलरची मदत दिली आहे. ही मदत जॅक डोर्से व बिल गेट्स नंतर जगातील तिसरी सर्वाधिक आर्थिक मदत आहे.

एकंदरीत जगातील अब्जाधिशांनी ७.२ अब्ज डॉलर आर्थिक मदत कोविडच्या काळात दिली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0