न्यू यॉर्कमध्ये कोरोनाचे मृत्यू अधिक का?

न्यू यॉर्कमध्ये कोरोनाचे मृत्यू अधिक का?

न्यू यॉर्कमध्ये कोरोना रुग्ण अधिक सापडण्याचे कारण म्हणजे या शहरात कोरोनाच्या तपासण्या सर्वाधिक केल्या गेल्या. जेवढ्या तपासण्या अधिक तेवढे कोरोनाचे रुग्ण सापडण्याची शक्यता अधिक आहे आणि जेवढे रुग्ण सापडतील तेवढ्या चाचण्या वाढतील असे गणित आहे.

प्लीज – माझा श्वास कोंडतोय..
पैशाचा वापर, भ्रम, व्यक्तीपूजा आणि ट्रंप भक्त
अफ़गाणिस्तानचा तिढा

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे व जगाचे आर्थिक केंद्र मानले गेलेल्या न्यू यॉर्कमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येने सर्वाधिक आकडा गाठला. या शहरात आता जगातील कोणत्याही देशातील शहरांपेक्षा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे.

११ एप्रिल अखेर अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या १,८१,०२६ इतकी होती. स्पेनमध्ये हा आकडा १,६१,८५२ तर इटलीत १,५२,२७१ होता. तर अमेरिकेत ११ एप्रिलमध्ये २०,३८९ कोरोनामुळे मृत्यू झाले त्यापैकी ८,६२७ मृत्यू हे एकट्या न्यू यॉर्क शहरातले (४२ टक्के) झाले. न्यूयॉर्कचा ४.७ टक्के मृत्यू दर हा अमेरिकेच्या  एकूण मृत्यूदरापेक्षा (३.४ टक्के) अधिक आहे, असे जॉन हॉपकिन्स युनिर्व्हसिटी सेंटर फॉर सिस्टिम सायन्स अँड इंजिनिअरिंगचे म्हणणे आहे.

न्यू यॉर्क शहर व नॉस्यू, सुफ्लोक, वेस्टचेस्टर व रॉकलँड या उपनगरात सुमारे ९३ टक्के कोरोनाचे रुग्ण आहेत. तर न्यू यॉर्कमधील कोरोनाचा मृत्यू दर ६ टक्के असून तो अन्य कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे.

न्यू यॉर्कसारखे मुक्त जीवनशैलीचे शहर प्रचंड लोकसंख्या व अधिक घनतेमुळे कोरोनाच्या महासाथीला बळी ठरले का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लॉस एंजेलिसच्या तुलनेत न्यू यॉर्कची लोकसंख्या ८० लाखांनी अधिक आहे. जवळपास दुप्पट आहे. न्यू यॉर्कची लोकसंख्या घनता २७ हजार प्रती चौ. मैल असून ती अमेरिकेत सर्वाधिक आहे. पण न्यू यॉर्कपेक्षा अधिक लोकसंख्या घनता (४० हजार प्रती चौ. मैल) असलेली अनेक शहरे आशिया खंडात आहेत. तेथे न्यू यॉर्कएवढे कोरोना रुग्ण अद्याप सापडलेले नाहीत.

पण न्यू यॉर्कमध्ये एवढे कोरोना रुग्ण सापडण्याचे कारण म्हणजे या शहरात कोरोनाच्या तपासण्या सर्वाधिक केल्या गेल्या. जेवढ्या तपासण्या अधिक तेवढे कोरोनाचे रुग्ण सापडण्याची शक्यता अधिक आहे आणि जेवढे रुग्ण सापडतील तेवढ्या चाचण्या वाढतील असे गणित आहे. त्यामुळे न्यू यॉर्कमध्ये अमेरिकेतल्या अन्य शहरांपेक्षा सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या केल्या गेल्या. असे प्रमाण आईसलँड, द. कोरिया व जर्मनीत दिसून येते. या तीनही देशात कोरोनाच्या चाचण्या सर्वाधिक घेतल्या गेल्या आहेत.

न्यू यॉर्कमध्ये कोरोनामुळे मृत्यू अधिक झाल्याचे एक कारण असेही आहे की, तेथे पसरलेली साथ अन्य भागापेक्षा दोन आठवडे अगोदर पसरली होती. त्यामुळे रुग्णालयांची तयारी वेळेत झाली नाही, साथ रोखण्याचे प्रयत्न उशीरा झाले व नागरिकांमध्ये सामाजिक विलगीकरणाविषयी योग्य संदेश वेळेवर पोहोचले नाही.

न्यू यॉर्कमध्ये कोरोना मृत्यूमध्ये सर्वाधिक संख्या पुरुषांची आहे. सर्वाधिक चाचण्या पुरुषांच्या झाल्या तर सर्वाधिक पुरुषांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

न्यू यॉर्कमध्ये अन्य देशाच्या तुलनेत अल्पसंख्याक व गरीब वर्गातील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

न्यू यॉर्कमध्ये कृष्णवर्णीय व हिस्पॅनिक लोकसंख्येचे प्रमाण ५१ टक्के आहे. तर एकूण कोरोना मृत्यूमध्ये या वर्गाची टक्केवारी ६२ टक्के आहे. ही टक्केवारी अधिक असण्याचे एक कारण म्हणजे या दोन्ही वर्गात कोरोना तपासणी श्वेतवर्णियांच्या तुलनेत अधिक घेण्यात आली आणि या दोन वर्गांमध्ये उच्च रक्तदाब व मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे.

न्यू यॉर्कमध्ये कृष्णवर्णीय व हिस्पॅनिक समाजाची आर्थिक परिस्थिती निम्न व मध्यम स्वरुपाची आहे. या वर्गाकडे स्वतःचा चांगला उपचार करून घेण्याएवढा  पैसा नाही. वेळ नाही. त्यांची राहण्याची ठिकाण, त्या भागातील इस्पितळांची उपलब्धता ही कारणे सुद्धा या वर्गात अधिक मृत्यू झाल्यामागे आहेत. अनेक रुग्णांनी उपचार घेण्यापेक्षा आपल्या घरात राहणे पसंत केले, त्यामुळे कोरोनाची साथ पसरत गेली.

न्यू यॉर्कमध्ये जे चित्र दिसले तसे साधर्म्य इटली, न्यू ऑर्नियन्स, इराणमध्येही दिसून आले. ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती सामान्य होती, ज्यांना आरोग्य उपचार घेणे शक्य नव्हते त्यांचे मृत्यू अधिक झाल्याचे या देशांत दिसून येते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0