लंडनः कोरोना विषाणूवर प्रभावशाली लस विकसित करण्यात ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाला यश आले आहे. ही लस माणसासाठी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
लंडनः कोरोना विषाणूवर प्रभावशाली लस विकसित करण्यात ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाला यश आले आहे. ही लस माणसासाठी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. या लसीचे नाव ChAdOx1 nCoV-19 असे ठेवण्यात आले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लस विकसित करण्यासाठी मानवी चाचण्या सुरू होत्या. या चाचण्या १,०७७ कोरोना रुग्णांवर घेण्यात आल्या असून या लसीने रुग्णांमध्ये पांढर्या पेशी व अँटिबॉडी विकसित झाल्या. पण याने कोरोनाची महासाथ आटोक्यात येईल असे आताच सांगता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
मात्र या लसीने दिलेल्या परिणामावर ऑक्सफर्डमधील वैज्ञानिक समाधानी असून मोठ्या संख्येने मानवी चाचण्या घेतल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल व त्यानंतर या लसीच्या यशाबद्दल अधिक सांगता येईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान या लसीच्या सुमारे १० कोटी डोसची ऑर्डर ब्रिटनच्या सरकारने दिली आहे.
लस कसे काम करते?
ChAdOx1 nCoV-19 नावाची ही लस अत्यंत वेगात विकसित करण्यात आली असून ही लस जेनेटिकली इंजिनियर्ड विषाणूच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. या विषाणूमुळे चिम्पाझी माकडांमध्ये ताप येतो. हा विषाणू शास्त्रज्ञांनी विकसित करून त्याचे संक्रमण होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. शिवाय या लसीमुळे शरीरातील रोगप्रतिकारक वाढते व ती कोरोना विषाणूंचा समर्थपणे मुकाबला करते, असे आढळून आले आहे.
ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीचे दुष्पपरिणाम अजून पूर्णपणे लक्षात आलेले नाहीत. पण ज्या रुग्णांवर चाचण्या घेतल्या आहेत त्यापैकी ७० टक्के रुग्णांना ताप व डोकेदुखीचा त्रास झाल्याचे दिसून आले आहे. हे दुष्परिणाम पॅरॅसिटॅमोलनेही कमी होऊ शकतात असे संशोधकांचे म्हणणे आहे.
या संदर्भात ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा. सारा गिल्बर्ट यांनी सांगितले की, ही लस कोविड-१९ला रोखणारी असून त्याची पुष्टी होण्यास थोडा काळ जाईल. पण या लसीचे मिळालेले निष्कर्ष सर्वांचे मनोधैर्य वाढवणारे आहेत.
मूळ बातमी
COMMENTS