जम्मू : २०१८मध्ये कठुआ येथे ८ वर्षाच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीतील ६ पोलिसांवर फिर्याद दाखल करण्याचे आ
जम्मू : २०१८मध्ये कठुआ येथे ८ वर्षाच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीतील ६ पोलिसांवर फिर्याद दाखल करण्याचे आदेश येथील स्थानिक न्यायालयाने दिले आहेत. हे ६ पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. पण तपास करताना या ६ पोलिसांनी खोटे साक्षीदार उभे केले होते, साक्षीदारांवर दबाव आणून त्यांना खोटे जबाब देण्यास भाग पाडले होते व साक्षीदारांचा शारिरीक-मानसिक त्रास केला असे न्यायालयाचे म्हणणे आहे.
कठुआ बलात्कार प्रकरणातील साक्षीदार सचिन शर्मा, नीरज शर्मा व साहिल शर्मा यांनी एक याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने एसआयटीतील ६ पोलिसांवर फिर्याद दाखल करावी असे आदेश जम्मू पोलिसांना दिले आहेत. या साक्षीदारांनी २४ सप्टेंबरला जम्मूमधील पक्का दंगा पोलिस ठाण्यात या ६ पोलिसांच्या विरोधात तक्रार नोंद केली होती पण त्याविषयावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मूळ बातमी
COMMENTS