‘अवास्तव माहितीमुळे झुंडबळीचे आकडे नाहीत’

‘अवास्तव माहितीमुळे झुंडबळीचे आकडे नाहीत’

नवी दिल्ली : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात झुंडबळीचे आकडे समाविष्ट न केल्याचे स्पष्टीकरण अखेर बुधवारी गृहखात्याने दिले. देशात ठिकठिकाणी झुंड

बिहार निवडणुकाः १२०० उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद
उन्नावचा तपास ७ दिवसात हवा : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
इतकं क्रौर्य नेमकं येतं कुठून?

नवी दिल्ली : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात झुंडबळीचे आकडे समाविष्ट न केल्याचे स्पष्टीकरण अखेर बुधवारी गृहखात्याने दिले. देशात ठिकठिकाणी झुंडबळीच्या घटना झाल्या असल्या तरी त्यातील काही घटनांवर विश्वास ठेवता येत नव्हता, काही घटनांची माहिती अपुरी व तर काहींची माहिती अवास्तव होती. अशा घटनांची नोंद गुन्हे अशी केली असती अनेक प्रश्न उपस्थित झाले असते, असे गृहखात्याचे म्हणणे आहे.

सोमवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड़ ब्युरोने आपला अहवाल जाहीर केला होता. पण या अहवालात जातीय दंगली, बलात्कार, गोरक्षणाच्या नावाखाली झालेला हिंसाचार, पत्रकार-आरटीआय कार्यकर्त्यांची हत्या, ऑनर किलिंग अशा सुमारे २५ गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध केली नव्हती. त्यावर अनेक थरातून प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावर मत व्यक्त करताना गृहखात्याने झुंडबळी, खाप पंचायतीने दिलेले निर्णय किंवा धर्माच्या नावाखाली झालेल्या हत्या, ऑनर किलिंग अशा गुन्ह्यांबाबत मिळालेली माहिती खोटी, अवास्तव स्वरुपाची असल्याने त्यांची सत्यता पडताळता येत नसल्याने  त्यांना अहवालात समाविष्ट करता येणे शक्य नव्हते, असे स्पष्टीकरण दिले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: