पायल रोहतगी ९ दिवसांसाठी कोठडीत

पायल रोहतगी ९ दिवसांसाठी कोठडीत

जयपूर : नेहरु घराण्याची निंदानालस्ती करणारे २ व्हीडिओ ट्विटरवर टाकल्याबद्दल अभिनेत्री पायल रोहतगीला ९ दिवसांची न्यायालयीन कोठडी बुंदी जिल्हा न्यायालया

ममता रस्त्यावर, प्रियंकाचे धरणे, सोनियांची टीका
हाथरसः आरोपींच्या कारागृहात भाजप खासदार पोहचले
नागरिकत्त्व कायद्याला विरोध वाढला

जयपूर : नेहरु घराण्याची निंदानालस्ती करणारे २ व्हीडिओ ट्विटरवर टाकल्याबद्दल अभिनेत्री पायल रोहतगीला ९ दिवसांची न्यायालयीन कोठडी बुंदी जिल्हा न्यायालयाने सोमवारी सुनावली.

पायल रोहतगी ही हिंदुत्ववादी विचारधारा व मुस्लिम विरोधी विचार प्रसृत करणारी अभिनेत्री म्हणून सोशल मीडियात प्रसिद्ध आहे. तिने ६ सप्टेंबर व २१ सप्टेंबर रोजी मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, संजय गांधी व राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे हनन करणारे व्हीडिओ ट्विटरवर प्रसिद्ध केले होते. यावर राजस्थानमधील इंडियन युथ काँग्रेसचे सरचिटणीस चर्मेश शर्मा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी १० ऑक्टोबररोजी रोहतगी विरोधात आयपीसी कलम ५०४, ५०५, ६७ अंतर्गत फिर्याद दाखल केली.

पण पोलिसांच्या नोटीसीला रोहतगी दाद देत नव्हत्या. अखेर त्यांना अहमदाबाद येथून अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतर रोहतगी यांनी पीएमओ व केंद्रीय गृहमंत्रालयाला उद्देशून एक ट्विट केले. या ट्विटमध्ये गूगलवरून आपण मोतीलाल नेहरु यांच्याविरोधात लिखाण केल्याची कबुली दिली. आणि मतस्वातंत्र्य हा विनोद आहे असे म्हटले.

रोहतगी यांचे कारनामे

पायल रोहतगी यांनी या अगोदर अनेक वादांना आमंत्रण दिले आहे. पण मोतीलाल नेहरु यांच्या संदर्भातील त्यांनी गूगलवरून घेतलेली माहिती त्यांना तुरुंगात जाण्यास भाग पाडणारी ठरली. रोहतगी यांनी मोतीलाल नेहरु यांच्या ५ पत्नी होत्या असे म्हटले होते. त्यात त्यांनी स्वरुप रानी यांच्याबरोबर थुस्सू रहमान बाई, मंजिरी, एक इराणी स्त्री व घरात काम करणारी महिला त्यांच्या पत्नी होत्या असा दावा केला होता. मोतीलाल यांना इराणी पत्नीकडून मोहम्मज जिना तर थुस्सू रहमान बाईकडून जवाहरलाल नेहरु हे मुलगे झाल्याचे म्हटले होते. रोहतगी यांनी आपण ही माहिती जवाहरलाल नेहरुंचे खासगी सचिव एम. ओ. मथाई यांच्या पुस्तकावरून घेतल्याचाही दावा केला होता.

एम. ओ. मथाई यांनी जवाहरलाल नेहरुंविषयी आठवणी सांगणारी दोन पुस्तके लिहिली आहेत. एका पुस्तकाचे नाव ‘रेमिनीसन्सन ऑफ द नेहरु एज’ तर दुसऱ्याचे नाव ‘माय डेज विथ नेहरु’ असे आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, या पुस्तकात मोतीलाल वा जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी अशी कोणतीही माहिती नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0