२७ ज्येष्ठ कलाकारांना घरे खाली करण्याच्या केंद्राच्या नोटीसा

२७ ज्येष्ठ कलाकारांना घरे खाली करण्याच्या केंद्राच्या नोटीसा

नवी दिल्लीः पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित प्रख्यात कथक गुरु पंडित बिरजू महाराज यांनी त्यांना मिळालेले सरकारी निवासस्थान ३१ डिसेंबर रोजी खाली करावे

माध्यमांनी चुकीचे वार्तांकन केल्याचा सरन्यायाधीशांचा आरोप
गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा; भारताचा विरोध
डांगे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ

नवी दिल्लीः पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित प्रख्यात कथक गुरु पंडित बिरजू महाराज यांनी त्यांना मिळालेले सरकारी निवासस्थान ३१ डिसेंबर रोजी खाली करावे अशी नोटीस केंद्र सरकारने जारी केली होती पण दिल्ली उच्च न्यायालयाने या नोटीशीवर स्थगिती दिली आहे.

न्या. विभू बाखरा यांनी केंद्राच्या नोटीशीवर स्थगिती आणत केंद्राकडून स्पष्टीकरणही मागवले आहे. बिरजू महाराज हे प्रसिद्ध कथक कलाकार असल्याने त्यांच्या कलेचा सन्मान म्हणून केंद्रानेच त्यांना निवासस्थान दिले होते, आता ही घरे त्यांना खाली करण्यामागील कारणे काय, अशी विचारणा न्यायालयाने केंद्राला केली.

गेल्या ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने कलाकार, नर्तक, संगीतकार असलेल्या ५० ते ९० वर्ष वयोगटातील देशातील २७ प्रतिष्ठित कलावंतांना त्यांना मिळालेली सरकारी घरे ३१ डिसेंबर २०२०पर्यंत खाली करण्यासंदर्भात नोटीसा पाठवल्या होत्या. या यादीत बिरजू महाराज, जतिन दास, पं. भजन सोपोरी, रीता गांगुली, ध्रुपद गायक उस्ताद एफ. वासिफुद्दीन डागर, कथक विशेषज्ञ गीतांजली लाल व कुचिपुडी नृत्यांगना गुरु जयराम राव यांचा समावेश होता. या सर्व कलाकारांनी केंद्राने घरे करण्याची नोटीस पाठवून आमचा सर्वांचा अवमान केल्याची, वेदना दिल्याची तक्रार केली होती. आम्ही सर्वांनी ६५ वय पार केले आहे, कोरोनाच्या महासाथीत अन्यत्र राहण्याचा कोणताही पर्याय नसताना आम्हाला केंद्र सरकार घरे खाली करायला कसे सांगते असा सवाल या कलावंतांनी उपस्थित केला होता.

केंद्राच्या या नोटीसीला बिरजू महाराज यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या अगोदर मोहनीअट्टम कलाकार भारती शिवाजी यांनी पूर्वीच याचिका दाखल केली होती, या याचिकेवरचा निर्णय अजून प्रलंबित आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0