केंद्राच्या खर्चात ६० टक्क्यांची कपात

केंद्राच्या खर्चात ६० टक्क्यांची कपात

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाचे आव्हान रोखण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या सर्व खात्याच्या पहिल्या तिमाहीमधील एकूण खर्चात ६० टक्के कपात करण्याचा निर्णय घे

पीएम केअर फंड एनआरआय, विदेशी देणगीदारांसाठी खुला
महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा होणार
इराणमधील २५५ भारतीयांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाचे आव्हान रोखण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या सर्व खात्याच्या पहिल्या तिमाहीमधील एकूण खर्चात ६० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निर्माण होणारी नवी आर्थिक समीकरणे जुळवण्यासाठी प्रत्येक खात्याने कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह सर्व खासदार, मंत्र्यांच्या वेतनात सरकारने कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरचे हे पहिले महत्त्वाचे पाऊल आहे. हा खर्च एकूण ३.४३ लाख कोटी रु.होईल असा प्राथमिक अंदाज आहे.

ही कपात गरजेची होती कारण येत्या तिमाहीत कर व करेतर महसूलात मोठी कमतरता सरकारला भासणार आहे. नियमानुसार प्रत्येक खात्याद्वारे त्यांना बजेट अंतर्गत मिळालेल्या तरतूदीमधून प्रत्येक तिमाहीत २५ टक्के खर्च करावा लागतो. आता हा खर्च कमी झाला आहे आणि जो खर्च होईल त्यावर देखरेख ठेवावी लागणार आहे, तशा सूचना अर्थ खात्याने सर्व खात्यांना दिल्या आहेत.

सरकारने या खर्च कपातीबाबत एक धोरण आखले असून पहिल्या टप्प्यात २० टक्के नंतर ४० टक्के व नंतर ६० टक्के अशी कपात केली जाणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0