कोरोना महासाथीचा वाढता प्रार्दुभाव पाहता महाराष्ट्राने पॅरोलवर सुमारे १७ हजार कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या ३५ हजारहून अधिक
कोरोना महासाथीचा वाढता प्रार्दुभाव पाहता महाराष्ट्राने पॅरोलवर सुमारे १७ हजार कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या ३५ हजारहून अधिक कैदी तुरुंगात आहेत. पॅरोलवर सोडण्यात येणार्या १७ हजार कैद्यांपैकी सुमारे ५ हजार कैदी कच्चे आहेत. यांची सुटका अगोदरच झाली आहे. ६० वर्षांवरील व गंभीर आजार असणार्यांना पॅरोलसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील आर्थर तुरुंगातील १८५ कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राज्याच्या गृहखात्याने घेतला आहे.
हा निर्णय घेण्याअगोदर एका उच्चस्तरिय समितीने राज्यातील ५० टक्के कैद्यांची पॅरोलवर तात्पुरती सुटका करण्याची सूचना सरकारला केली होती.
पॅरोलवर सोडण्यात येणार्या ९ हजार कैद्यांमधील ३ हजार कैद्यांनी सात वर्षांची शिक्षा अगोदरच भोगली आहे. त्यामुळे त्यांचा विचार पॅरोलसाठी केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पण मोका, टाडा, यूएपीए, पीएमएलए व बडे आर्थिक गुन्ह्यांखाली तुरुंगात असणार्यां कैद्यांची सुटका करणार नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
राज्यात सध्या ९ कारागृहे बंद करण्यात आली आहेत.
COMMENTS