भारताचा प्रवास टाळाः अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंडच्या सूचना

भारताचा प्रवास टाळाः अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंडच्या सूचना

वॉशिंग्टनः भारतातील कोरोनाची दुसरी लाट वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अमेरिकेने आपल्या नागरिकांना भारतात प्रवास करू नका अशा सूचना दिल्य

अमेरिका-तालिबान दोहा करार : एक अनपेक्षित वळण
अफ़गाणिस्तानचा तिढा
अमेरिका-इराण संघर्षात भारताचा बळी

वॉशिंग्टनः भारतातील कोरोनाची दुसरी लाट वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अमेरिकेने आपल्या नागरिकांना भारतात प्रवास करू नका अशा सूचना दिल्या आहेत. अमेरिकेच्या रोग प्रतिबंधक व नियंत्रण केंद्राने एक नोटीस काढून अमेरिकेच्या नागरिकांना भारतात प्रवास करू नये व कोरोनाचा संसर्गापासून दूर राहावे अशा सूचना दिल्या आहेत.

अमेरिकेने आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात चार स्तरीय प्रणाली तयार केली असून भारताचा क्रमांक सर्वाधिक चौथ्या स्तरावर ठेवला आहे. भारत हा अमेरिकी प्रवाशांसाठी अप्रत्यक्ष धोका बनला असल्याचे अमेरिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

कोविड-१९च्या काळातही भारताचा प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर तेथे जाण्याअगोदर आपले लसीकरण करून घेणे गरजेचे असून सर्व प्रवाशांनी मास्क घालणे, अन्य जणांपासून सहा फुटांचे अंतर राखणे, गर्दी टाळणे व हात धुणे अशा सूचना दिल्या आहेत.

अमेरिकेबरोबर ब्रिटनने भारताला लाल श्रेणीत दाखल केले आहे. लाल श्रेणीचा अर्थ त्या देशात अन्य देशांच्या प्रवाशांना येण्यास बंदी घातली जाते. ब्रिटनने आपले नागरिक व आयरिश नागरिकांना वगळून अन्य नागरिकांनाही प्रवेशास मनाई घातली आहे. जे ब्रिटिश नागरिक मायदेशी परत येतील त्यांना हॉटेलमध्ये १० दिवस विलगीकरणात राहावे लागेल, असे स्पष्ट केले आहे.

ब्रिटनपाठोपाठ हाँगकाँगनेही भारतातून येणार्या विमानांना प्रवेश बंदी घातली आहे. तसेच न्यूझीलंडनेही भारतात जाण्यासाठी निर्बंध घातले आहेत.

पाकिस्ताननेही भारतातून येणार्या प्रवासी वाहतुकीला दोन आठवड्यांची बंदी घातली आहे. या बंदीत विमान प्रवास व रस्तेमार्गे देशात येणार्या भारतीय प्रवाशांना बंदी आहे.

गेल्याच आठवड्यात बैसाखी सणाच्या पार्श्वभूमीवर भारतातून ८१५ शीख भाविक लाहोर येथे गेले होते. त्या सर्वांना १० दिवस राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

बोरिस जॉन्सन यांचा दुसर्यांदा भारतदौरा रद्द

दरम्यान, भारतातील कोविड-१९ महासाथीची परिस्थिती गंभीर पाहून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यांचा भारतदौरा रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वेळी ते २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे भारताने आमंत्रित केले होते. त्यावेळी ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने जॉन्सन यांना आपला दौरा रद्द करावा लागला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: