चीनने यंदाच्या ऑगस्टमध्ये प्रगत ‘हायपरसोनिक फ्रॅक्शनल ऑर्बिटल बॉम्बार्डमेंट सिस्टम’ अर्थात ‘फॉब्स’ची (अमेरिकेकडे अद्याप ही क्षमता नाही) चाचणी घेण्याचा निर्णय करून अमेरिकेतील गुप्तचर समुदायाला आश्चर्याचा धक्काच दिला. एवढेच नाही तर या दोन देशांतील लष्करी तंत्रज्ञानातील तफावत पेंटॅगॉनच्या कल्पनेहून खूपच कमी आहे हेही याद्वारे दिसून आले आहे.
चीनने यंदाच्या ऑगस्टमध्ये प्रगत ‘हायपरसोनिक फ्रॅक्शनल ऑर्बिटल बॉम्बार्डमेंट सिस्टम’ अर्थात ‘फॉब्स’ची (अमेरिकेकडे अद्याप ही क्षमता नाही) चाचणी घेण्याचा निर्णय करून अमेरिकेतील गुप्तचर समुदायाला आश्चर्याचा धक्काच दिला. एवढेच नाही तर या दोन देशांतील लष्करी तंत्रज्ञानातील तफावत पेंटॅगॉनच्या कल्पनेहून खूपच कमी आहे हेही याद्वारे दिसून आले आहे.
सोव्हिएट युनियनमध्ये १९६०च्या दशकातच तत्कालीन शास्त्रज्ञ व इंजिनीअर्सनी ‘फॉब्स’ विकसित केली होती. यामध्ये पृथ्वीच्या सुमारे १५० किलोमीटर निम्न कक्षेत (लो-अर्थ ऑर्बिट) अण्वस्त्रे प्रक्षेपित करण्याची सोय असते. इच्छित लक्ष्याचा भेद करण्यापूर्वी ही प्रणाली पृथ्वीवर तरंगत राहते. अमेरिकेने त्या काळात विकसित केलेल्या क्षेपणास्त्रांचा इशारा देणाऱ्या नेटवर्कमुळे सोव्हिएत युनियन प्रेरित झाले होते. अमेरिकेच्या या नेटवर्कमधील सर्व निरीक्षण स्थळे उत्तरेकडे निर्देश करणारी होती, कारण, सोव्हिएत युनियनमधून कोठूनही प्रक्षेपित झालेल्या (शीतयुद्धाच्या काळात) क्षेपणास्त्राचा सर्वांत कमी लांबीचा मार्ग हा उत्तर गोलार्धातून जाण्याची शक्यता होती.
अर्थात ‘फॉब्स’ प्रक्षेपित क्षेपणास्त्राला पृथ्वीच्या वरून एका धृवापासून दुसऱ्या धृवापर्यंतच्या कक्षेत भ्रमणाची मुभा देणार आहे, दक्षिणेकडून क्षेपणास्त्र अमेरिकेच्या वरील कक्षेत जाऊ शकेल आणि विध्वंस घडवून आणू शकेल.
सुदैवाने सोव्हिएत युनियनने हे शस्त्र कधीच तयार केले नाही, कारण, अमेरिकेने आपली इशारा प्रणाली अद्ययावत करून त्यात क्षेपणास्त्रांसाठी अवकाशस्थित टेहळणीचा समावेश केला. तेव्हापासून अमेरिका व रशिया यांच्यासह अनेक देश अशा प्रकारची प्रणाली विकसित करण्याच्या प्रयत्नांत आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र, १७ ऑक्टोबर रोजी ‘फायनान्शिअल टाइम्स’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीने खळबळ उडवून दिली आहे. ती बातमी म्हणजे चीनने यंदा’फॉब्स’ची निर्मिती केली व चाचणीही घेतली.
या बातमीनुसार, चीनच्या संरक्षण विभागाने ध्वनीच्या हवेतील वेगाच्या तुलनेत २७ पट अधिक ३३,८०० किमी/तास, वेगाने प्रवास करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने पृथ्वीभवती घिरट्या घातल्या आणि त्यानंतर चीनमधील लक्ष्याचा वेध घेण्यासाठी हे क्षेपणास्त्र खाली आले. सुमारे ४० किलोमीटर अंतराने हा वेध हुकला. या वाहनाचा वेग बघता ते ‘हायपरसोनिक फोब्स’ असणार हे स्पष्ट आहे. या वाहनाचा माग ठेवणे किंवा/आणि ते मध्येच अडवणे कठीण आहे.
“हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल्स निम्न पथांद्वारे उडत असल्यामुळे विमानांसारखी भासतात. म्हणूनच त्यांचा माग ठेवणे व ती नष्ट करणे कठीण असते,” असे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतील प्राध्यापक तसेच चीनकडील अण्वस्त्रांबाबतचे तज्ज्ञ टेलर फ्रॅव्हेल म्हणाले.
अर्थात, आजघडीला उपग्रहांचा वापर तसेच जमिनीवरील व अवकाशातील संवेदके यांच्यात एवढी वाढ झालेली आहे की, ‘फॉब्स’चा ‘पारंपरिक’ आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांहून (आयसीबीएम) अधिक उपयोग होऊच शकणार नाही.
आयसीबीएम, ‘फॉब्स’ प्रमाणेच, एका खंडातून प्रक्षेपित केली असता, दूर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेऊ शकतात पण ते कक्षेत प्रवेश करत नाहीत. आयसीबीएम्स पॅराबोलिक पथाचा वापर करतात. लक्ष्याचा वेध घेण्यासाठी खाली येण्यापूर्वी ती १,२०० किलोमीटर उंचीपर्यंत वर जातात.
मात्र, स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस या विषयातील तज्ज्ञ मार्को लंगब्रोक यांनी फायनान्शिअल टाइम्समधील बातमीसंदर्भात लिहिलेल्या लेखात असे म्हटले आहे की, यूएस स्पेस फोर्सकडील अवकाशस्थित इन्फ्रारेड प्रणाली तरीही ‘फॉब्स’द्वारे झालेली प्रक्षेपणे टिपू शकेल पण अमेरिकेच्या बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स (बीएमडी) प्रणालीच्या कक्षेत कदाचित ‘फॉब्स’ येणार नाही. याचा अर्थ ‘फॉब्स’च्या काही लाभांपैकी एक म्हणजे ते बीएमडीवर मात करू शकेल आणि खुद्द अमेरिकेतील लक्ष्यांचा वेध घेऊ शकेल. म्हणूनच चीनने ‘फॉब्स’ची चाचणी केल्यामुळे अमेरिकेला हादरा बसणे अपेक्षित आहे. केवळ चाचणी केली याचा अर्थ चीनकडे कार्यकारी हायपरसोनिक ‘फॉब्स’ आहे असा होत नाही, असेही फ्रॅवेल यांनी नमूद केले आहे. मात्र, चीन अशा प्रकारच्या प्रणालीची चाचणी करू शकते एवढेही अमेरिकेला हलवून सोडण्यासाठी पुरेसे आहे, कारण, चीनने केलेल्या लष्कराच्या आधुनिकीकरणाला अमेरिकेने कायमच कमी लेखले आहे, असे एका अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले आहे.
चीन सरकारच्या ग्लोबल टाइम्स या मीडिया आउटलेटने १७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अग्रलेखात म्हटले होते:
“बातमीच्या विश्वासार्हतेवर चर्चा करण्यात अर्थ नाही. मात्र, चीन व अमेरिका यांच्यातील लष्करी तंत्रज्ञानाबाबतची तफावत कमी होत आहे हे महत्त्वाचे आहे. चीनला अमेरिकेसोबत ‘शस्त्रास्त्रस्पर्धा’ करण्याची गरज नाही.”
चीनवर कधीही हल्ला केला जाऊ शकतो या भ्रमात अमेरिकेने राहू नये यासाठीही ही चाचणी केलेली असू शकते. ‘फॉब्स’चा एक फायदा म्हणजे त्यामुळे, बीएमडीच्या जोरावर, अमेरिका चीनला कमी लेखणार नाही, असेही लंगब्रोक यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे. त्यांच्या मते आता अमेरिका बीएमडीची व्याप्ती वाढवण्यासाठी कृती करेल आणि ‘फॉब्स’ला शह देण्यासाठी काही क्षेपणास्त्रे विकसित करेल.
‘फॉब्स’चा वापर अण्वस्त्रे तैनात करण्यामध्ये आणखी एक मोठी समस्या आहे. ती म्हणजे ‘फॉब्स’मुळे आउटर स्पेस ट्रिटीचे उल्लंघन होणार आहे. हा करार १० ऑक्टोबर, १९६७ रोजी लागू झाला आहे. या करारावर स्वाक्षरी करणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारताचाही समावेश होतो. २०१९ मध्ये अँटि-सॅटेलाइट चाचणी घेऊन भारताने या कराराचा अवमान केल्याप्रकरणी टीका ओढवून घेतली होती.
अर्थात अमेरिका चीनच्या योजनांवर ओएसटीच्या आधारे आक्षेप घेणार नाही. २०१८ मध्ये रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी रशियाला रस असलेल्या शस्त्रास्त्रांचे काही तपशील जाहीर करून अमेरिकेला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अमेरिकेने आक्षेप नोंदवला नाही.
कल्पना करा, एखादे आयसीबीएम त्याच्या सर्वोच्च उंचीवर पोहोचले आहे आणि लक्ष्याच्या दिशेने खाली येत आहे पण क्षेपणास्त्राद्वारे एकाच लक्ष्यावर हल्ला न चढवला जाता, या क्षेपणास्त्राचे अनेक भाग त्यापासून वेगळे होत आहेत आणि विविध लक्ष्यांचा वेध घेत आहेत. अशा शस्त्रांना मल्टिपल इंडिपेण्डण्टली टार्गेटेबल रिएण्ट्री व्हेईकल्स किंवा एमआयआरव्ही असे म्हटले जाते.
विश्लेषक टाउंटन पेन यांच्या मते, सोव्हिएतच्या ‘फॉब्स’मुळे ओएसटीचा भंग होत नाही, असा युक्तिवाद अमेरिकेनेच १९६७ मध्ये केला होता. त्याचे कारण असे:
“अवकाशस्थित अण्वस्त्रांचे प्रक्षेपण झाले तर कराराचा भंग होईल; तात्पुरत्या काळासाठी कक्षेत स्थापित भूस्थित प्रणालींमुळे कराराचा भंग होणार नाही. अण्वस्त्र प्रसारबंदी करारासाठी सोव्हिएत युनियनचे सहकार्य मिळवण्याच्या दृष्टीने अमेरिकेने हा युक्तिवाद केला होता.”
सोव्हिएत युनियनने केलेली ‘फॉब्स’ची चाचणी हे कराराचे उल्लंघन ठरत नाही, कारण, हे क्षेपणास्त्र संपूर्ण कक्षाभ्रमण करण्यापूर्वीच कक्षेतून बाहेर येते (म्हणूनच फोब्सच्या नावात फ्रॅक्शनल असा शब्द आहे) असे अमेरिकेने नमूद केले होते.
अर्थात हा अमेरिकेचा संधीसाधूपणा होता असे सांगून, लंगब्रोक यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी, हा युक्तिवाद नाकारला आहे. अवकाशाच्या कक्षेत प्रवेश करणे आणि कक्षेत राहणे यांतील फरक क्षुल्लक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
अमेरिकेने १९६८ मध्ये केलेला युक्तिवाद चीनने केलेल्या ‘फॉब्स’ चाचणीलाही लागू होऊ शकतो. चीन लष्कर तंत्रज्ञानाबाबत करत असलेले शक्तीप्रदर्शन अनेक सीमांवरील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहे.
१ ऑक्टोबरपासून चार दिवस, चीनने तैवानच्या हवाई संरक्षण प्रदेशात लढाऊ विमाने उडवली होती. हा तैवानच्या प्रदेशावर आपला दावा सांगण्याचाच भाग होता. अमेरिका व कॅनडा यांनी १४-१५ ऑक्टोबर रोजी यूएसएस डेवे हा क्षेपणास्त्र विध्वंसक तैनात करून याला उत्तर दिले. त्यानंतर दोनच दिवसांत, चीनने ऑगस्टमध्ये, हायपरसोनिक फोब्सची चाचणी घेतल्याची बातमी प्रसिद्ध झाली. आता अमेरिका काय करणार?
COMMENTS