कोरोना रोखण्यासाठी गायत्री मंत्र उपचाराला परवानगी

कोरोना रोखण्यासाठी गायत्री मंत्र उपचाराला परवानगी

नवी दिल्लीः देशात कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना विज्ञान व तंत्रज्ञान खात्याने कोरोनावर उपचार म्हणून गायत्री मंत्राचा जप व प्राणायम सारख्य

सरकारच्या अट्टाहासामुळे भारतीय कंपनी संकटात?
वर्षभरात सरकारने काय केले?- सोनियांचा सवाल
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आव्हान किती?

नवी दिल्लीः देशात कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना विज्ञान व तंत्रज्ञान खात्याने कोरोनावर उपचार म्हणून गायत्री मंत्राचा जप व प्राणायम सारख्या प्रकारावर संशोधन व्हावे म्हणून आर्थिक निधी मंजूर केला आहे.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार गायत्री मंत्राचे कोरोना रुग्णांवर होणारे परिणाम ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात पाहिले जाणार आहेत. आयसीएमआरने या परिक्षणाला क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्रीमध्ये मंजुरी दिली असून २० लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णावर गायत्री मंत्राच्या जपाचा होणारा परिणाम पाहिला जाणार आहे. एम्समध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णांपैकी एक गट १४ दिवसांसाठी एका योगशिक्षकाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. या योगतज्ज्ञाकडून कोरोना रुग्णावर गायत्री मंत्राच्या जपाचा, श्वास संबंधी व्यायामाचा कसा परिणाम होतो, यावर संशोधन केले जाणार आहे. हे संशोधन हाती आल्यानंतर कोरोना रुग्णाच्या पेशींमध्ये कशी सुधारणा झाली आहे, याची माहिती जमा केली जाणार आहे.

मात्र गायत्री मंत्राचा जप व प्राणायम हे योग उपचार गंभीर रुपाने आजारी असलेल्या कोरोना रुग्णावर केले जाणार नाहीत.

या संदर्भात श्वासरोग विशेषज्ञ व एम्स ऋषिकेशच्या साहाय्यक प्राध्यापक रुची दुआ यांनी सांगितले की, गायत्री मंत्रावरच्या संशोधनासाठी रुग्णांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असून संस्थेमधील योगवर अभ्यास करणार्या पदव्युत्तर संशोधकांची एक टीम त्यावर काम करणार आहे. पुढील दोन महिन्यात या संदर्भातील अभ्यास हाती लागेल, असे दुआ म्हणाल्या.

सरकारने या संदर्भात तीन लाख रुपयाचा फंड रुग्णालयाला दिला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0