कोविडच्या नावाखाली फूड डिलिव्हरी कर्मचारी वाऱ्यावर

कोविडच्या नावाखाली फूड डिलिव्हरी कर्मचारी वाऱ्यावर

कोविड-१९ साथीमुळे २४ मार्च २०२० रोजी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर झाला, त्यानंतरची गोष्ट. स्विगीसाठी फूड डिलिव्हरीचे काम करणारा २७ वर्षांचा राज दोन दिव

राज्यात कोरोनाची नवी नियमावली जाहीर
बोरिस जॉन्सन यांचा प्रजासत्ताक दिनाचा दौरा रद्द
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ‘कोरोना’वरून सुप्त संघर्ष

कोविड-१९ साथीमुळे २४ मार्च २०२० रोजी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर झाला, त्यानंतरची गोष्ट. स्विगीसाठी फूड डिलिव्हरीचे काम करणारा २७ वर्षांचा राज दोन दिवस घरीच थांबला. त्याच्या सोबत काम करणाऱ्यांना पोलिसांनी थांबवल्याच्या, त्यांच्या बाइक्स जप्त केल्याच्या बातम्या तो ऐकत होता. राजच्या बॉसने त्याला फूड डिलिव्हरीसाठी जाण्यास सांगितले आणि पोलिसांनी थांबवले तर मी त्यांच्याशी बोलतो असे आश्वासनही दिले. प्रत्यक्षात राजला पोलिसांनी थांबवले तेव्हा बॉसचे उत्तर ‘तू बघून घे’ असे होते. हे ‘बघून घेण्यासाठी’ राजला दोन तास घालवावे लागले. काही आठवड्यांनंतर ‘तू बघून घे’ हे कंपनीचे धोरणच झाले. सरकारने डिलिव्हरी बॉइजना फ्रंटलाइन वर्कर्स म्हटले; कंपनीने त्यांना ‘हिरो’ची उपाधी दिली; स्विगी आणि अन्य कंपन्यांनी त्यांच्या सन्मानार्थ म्युझिक व्हिडिओ काढला. दुसऱ्या बाजूला मात्र कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जात होत्या, डिलिव्हरी बॉइजच्या वेतनात कपात होत होती आणि कंपनी मानवी व्यवस्थापकांच्या जागी अल्गोरिदम्स व डिजिटल प्रणालींचा वापर करू लागली होती. कंपनीने काही उपक्रम कोविड-१९ साथीच्या नावाखाली बंद केले पण याचे नियोजन खरे तर साथीच्या बरेच आधी झाले होते, असे स्विगी कर्मचाऱ्यांचे मत आहे.

दिल्ली एनसीआरमधील डिलिव्हरी कर्मचारी विक्रम सांगतो, “मोदीजींनी मन की बातमध्ये आमचे कौतुक केले, कंपनीनेही कौतुक केले पण आम्हाला मिळाले काहीच नाही. कोरोनाच्या काळात एवढे काम करून आम्हाला बक्षीस म्हणून वेतनकपात मिळाली.” जुलैपर्यंत स्विगीने १,४५० कर्मचाऱ्यांना कमी केले होते. यामध्ये व्यवस्थापकांचा समावेशही होता. साथीच्या काळात कंपनीने कर्मचाऱ्यांचे मूलभूत वेतन कापले किंवा किमान डिलिव्हरी फी १५ रुपयांपर्यंत खाली आणली. त्यात इंधनांच्या किमती गगनाला भिडल्या. दोन वर्षांपूर्वी डिलिव्हरी कर्मचाऱ्याला मासिक ४०,००० रुपयांपर्यंत उत्पन्न होते. ते आता २०,००० रुपयांवर आले आहे.

अर्थात स्विगीने या मुद्दयाला आक्षेप घेतला आहे. आपले डिलिव्हरी कर्मचारी कोविड-१९ साथीच्या पूर्वी कमावत होते, त्याहून अधिक कमावत आहेत असा दावा स्विगीच्या प्रवक्त्याने केला. मात्र, आकडेवारी देण्यास नकार दिला. चेन्नई, हैदराबाद आणि दिल्लीतील अनेक कर्मचारी संपावर गेले. मात्र, त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी व्यवस्थापकही उरलेले नाहीत, असे ऑल इंडिया गिग वर्कर्स युनियनच्या समन्वयक रिक्ता कृष्णस्वामी म्हणाल्या. स्विगीच्या प्रवक्त्यांनी हेही नाकारले. कंपनीने रॅपिडो आणि शॅडोफॉक्ससारख्या एजन्सीजकडून कर्मचारी घेऊन संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला, असेही कृष्णस्वामी यांनी सांगितले.

फेब्रुवारीमध्ये स्विगीचे मूल्यांकन ३.३ अब्ज डॉलर्सपर्यंत गेले होते. मानवी कर्मचाऱ्यांच्या जागी इंटेलिजंट प्रणालींचा वापर करण्याचा घाट स्विगीने मोठ्या प्रमाणात घातला आहे. गिग कर्मचाऱ्यांनी साथीच्या काळात किती महत्त्वाची भूमिका बजावली आहे याचा त्यांना विसर पडला आहे.

सगळे गिग कर्मचारी समान आहेत असेही नाही. ७७ टक्के गिग कर्मचारी त्यांच्या कामाच्या तुलनेत अधिक अर्हताप्राप्त आहेत. फूड डिलिव्हरी हे सर्वांत कठीण गिग काम आहे. डिलिव्हरी एजंट्स प्रदूषणामध्ये दीर्घकाळ मोटर सायकल्सवर काम करतात. अल्गोरिदमने मोजलेल्या मार्गावर त्यांना ठराविक मिनिटांत डिलिव्हरी करावी लागते. जीपीएसचा वापर करून त्यांना ट्रॅक केले जाते. त्यांचा पोशाख व्यवस्थित आहे हे दाखवण्यासाठी त्यांना वारंवार सेल्फीज अपलोड करावे लागतात. आता त्यांच्या शरीराचे तापमानही तपासले जाते. ऑक्सफर्ड विद्यापीठातील एका प्रकल्पात समोर आलेल्या माहितीनुसार, स्विगी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी झोमॅटो या सर्वांत अन्याय्य गिगवर्क करून घेणाऱ्या कंपन्या आहेत.

कोविड साथीच्या पूर्वीच जानेवारी २०२० स्विगीने डिजिटल प्रणाली लाँच केली आणि त्यामुळे अनेक व्यवस्थापकांनी नोकऱ्या गमावल्या. आता रायडर्सच्या सर्व चुकांची नोंद अल्गोरिदम्सद्वारे ठेवली जाते आणि त्यांना इशारे दिले जातात. तिसऱ्या इशाऱ्यानंतर कर्मचाऱ्याचा आयडी कामयस्वरूपी डिअॅक्टिव्हेट केला जातो.

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात पोलिस डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना थांबवत होते. सुरतमधील डिलिव्हरीमन फैजलची बाइक जप्त करण्यात आली, ती परत मिळवण्यासाठी त्याला २००० रुपये द्यावे लागले. त्याने स्विगीकडे या रकमेची मागणी केली असता, ‘काम करायचे असेल तर करा, नाहीतर घरी जा’ असे उत्तर मिळाल्याचे तो सांगतो. लॉकडाउनच्या काळात आपण रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना अन्नपदार्थ पोहोचवले. यामध्ये मोठी जोखीम होती. आपल्याला कोविडचा प्रादुर्भाव झाला असता, तरी कंपनीचे धोरण ‘तुझे तू बघून घे’ असेच असते, असे फैजल सांगतो. एप्रिलमध्ये डिलिव्हरीसाठी निघालेला असताना इर्शाद या डिलिव्हरी कर्मचाऱ्याला अपघात होऊन त्याच्या हाताला दुखापत झाली. मात्र, स्विगीने त्याला भरपगारी रजाही दिली नाही. एग्झिक्युटिव्ह्जना भरपगारी रजा, व्हाउचर्स देणारा ‘स्विगी स्माइल्स’ हा उपक्रमही यावर्षी अचानक बंद करण्यात आला. कर्मचाऱ्यांनाच पैशाच्या स्वरूपात बक्षिसे हवी असल्याने हा उपक्रम खंडित केल्याचे स्विगीच्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे.

स्विगीचे सहसंस्थापक श्रीहर्ष मजेती यांनी १८ मे रोजी सर्व कर्मचाऱ्यांना ईमेल करून नोकरकपातीची घोषणा केली. हे सगळे कोविड साथीमुळे करणे भाग पडत असल्याचे त्यांनी म्हटले. कंपनी “युनिट इकोनॉमिक्स” सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही यात नमूद होते. निखिल नावाच्या व्यवस्थापकाला क्वेस या थर्ड-पार्टी कंपनीच रुजू होण्याची विनंती करण्यात आली. ही नोकरी आपल्या कौशल्यांच्या तुलनेत योग्य नसल्याने निखिलने ही विनंती नाकारली. आपण स्विगीच्या पेरोलवरून नाहीसे झालो की नोकरकपातीचे लाभही आपल्याला मिळणार नाहीत ही चिंता त्याला होती. दुसऱ्या दिवशीच निखिलला आणि क्वेसवर जाण्यास नकार देणाऱ्या सर्व व्यवस्थापकांना कामावरून कमी करण्यात आले.

जून महिन्यात लॉकडाउन अंशत: हटल्यानंतर फूड डिलिव्हरीचा व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागला. तरीही २८ जुलै रोजी स्विगीने आणखी ३५० कर्मचाऱ्यांना काढून टाकले. कोविडपूर्व काळाच्या तुलनेत अद्याप ऑर्डर्सची संख्या निम्मी असल्याचे स्विगी प्रवक्त्याने यावेळी सांगितले. एआयजीडब्ल्यूयूच्या कृष्णस्वामी यांच्या मते मात्र, कंपनीने कोविड साथीच्या नावाखाली, नोकरकपात आणि वेतनकपातीची संधी साधली.

कोविड-१९ साथीपूर्वीच स्विगीने अनेक कपाती केल्या होत्या असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

एकंदर डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी नोकरीचे पर्याय फारसे नाहीत. स्विगीतील नोकरी सोडल्यास झोमॅटो हा पर्याय ठरतो आणि एम्प्लॉयर म्हणून झोमॅटोची कीर्तीही फारशी चांगली नाही. एकंदर नोकऱ्यांचा तुटवडा आहे.

सध्या ऑर्डर्सची संख्या वाढताना दिसत आहे, काम पुन्हा वाढत आहे. त्यामुळे आता या कपाती सुरू ठेवणे अन्य धोरणांचा भाग आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संप योग्य आहे, असे कृष्णास्वामी म्हणाल्या. संपावरील अनेक एग्झिक्युटिव्ह्जची कार्ड ब्लॉक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एकंदर फूड डिलिव्हरीच्या कामासाठी कंपन्यांना सहज लोक मिळत आहे हे यातून स्पष्ट आहे.

आता स्विगी ‘अपसामान्य परिस्थिती’ समजून घेण्यासाठी व्यवस्थापकांची नियुक्ती करत आहे. काही डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह्ज हिंसक झाल्याने सुव्यवस्था राखण्यासाठी हे पाऊल उचलावे लागले, असे स्विगीच्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे.

अर्थात परिस्थिती वेगळी आहे. लॉकडाउनच्या काळात राज कंटेन्मेंट झोनमधील काही डिलिव्हरीज करू शकला नाही, त्यामुळे त्याचे कार्ड ब्लॉक करण्यात आले. व्यवस्थापकांच्या हातापाया पडून ते पुन्हा सुरू करून घेण्यात २५ दिवस केले. मध्यंतरी घरमालकाने भाडे वाढवले, लग्नासाठी घेतलेले ३ लाख रु.चे कर्ज राजच्या डोक्यावर होते. आज राज सकाळी ६ ते दुपारी २ या काळात अमॅझोनच्या डिलिव्हरीज करतो. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत स्विगीच्या डिलिव्हरी करतो. तो आठवड्याचे सातही दिवस काम करतो पण कोविड-१९ साथीच्या पूर्वी तो जेवढे कमावत होता, त्याच्या निम्मेही पैसे कमावू शकत नाही आहे. मिलमध्ये काम केले तरी या तुलनेत वाढीची संधी आहे, असे तो म्हणतो. मिलमधले साधे कामगार काही काळाने कलर मिक्सिंगमधील कुशल कामगार होतात, आणखी काही काळाने सुपरवायजर होतात. मात्र, फूड डिलिव्हरीच्या कामात पुढे जाण्यासाठी काहीच वाव नाही, असे तो सांगतो.

(लेखातील काही नावे बदलण्यात आली आहेत.)

मूळ लेख: 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0