लॉकडाऊनचा तिसरा टप्पा व वास्तव

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा व वास्तव

कोरोनाच्या चाचण्या कमी घेतल्या जात असल्याने रुग्णांची संख्या कमी दिसतेय. पण वास्तव वेगळेच आहे.

नांदेड स्फोटात उजव्या विचारसरणीच्या नेत्यांची भूमिका – माजी संघ स्वयंसेवकाचा दावा
श्रीमंत शेतकरी.. आंतररराष्ट्रीय कारस्थान.. मूर्खपणा
ती ऑफर नाकारली – पवार

नवी दिल्ली : प्रत्येक १२ दिवसांनंतर भारताला कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत दुप्पट वाढ होतेय असे सरकारचे म्हणणे आहे. म्हणजे लॉकडाऊनचा निर्णय कोरोना साथ रोखण्यात उपयोगी ठरत असल्याचा सरकारचा दावा आहे.

पण आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा देशात पुकारण्यात आला आहे आणि काही आकडेवारी पाहता आपल्याला एक वेगळेच चित्र समोर दिसत आहे.

उदाहरणार्थ गेल्या आठवड्यात आरोग्य मंत्रालयाने असे सांगितले की, आसाम, तेलंगण व हिमाचल प्रदेशातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली असून राष्ट्रीय सरासरीच्या म्हणजे ५९, ७०.८,१९१.६ दिवसांच्या तुलनेत ती सुधारत आहे.

पण दुसरीकडे चाचण्यांची संख्याही कमी होताना दिसत आहे. साथीरोगविषयी राष्ट्रीय तंत्र सल्लागार समितीचे एक माजी सदस्य डॉ. जेकब पुलियेल यांच्या मते, आपण जेवढ्या कमी चाचण्या घेऊ तेवढे कोविड-१९चे कमी रुग्ण सापडतील व येणारा कर्व्ह हा सरळ असेल.

सगळ्यांना राजकीय व्यूहनीतीकार प्रशांत किशोर माहिती आहेत. पण हेच प्रशांत किशोर संयुक्त राष्ट्रांमध्ये सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ म्हणून पूर्वी काम करत होते. त्यांनी २६ एप्रिलला एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, कोरोनाविषयी तांत्रिक भाषा व आकडेवारीवरचे भाष्य पाहता भारतात कोरोना केसेसचे प्रमाण मंदावत असून त्याचे एक कारण असे की, एप्रिलच्या सुरवातीस जेवढ्या आपण कोरोना चाचण्या घेतल्या होत्या, त्याच्या निमपट चाचण्या आता घेतल्या जात आहेत.

३० मार्चला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एक आकडेवारी जाहीर केली होती. या आकडेवारीवर ते म्हणतात, की गेल्या ५ दिवसांत कोरोना चाचण्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत ६८ टक्के अधिक आहे. ३० मार्चनंतरच्या पाच दिवसांत ही टक्केवारी १०८ टक्के इतकी झाली. याचा अर्थ चाचण्यांचा वेग वाढू लागला होता. पण ९ एप्रिलनंतर हा वेग ८१ टक्क्यांवर आला. त्याचा अर्थ कोरोनाच्या नव्या चाचण्या कमी घेतल्या जात आहेत. त्यामुळे त्यावेळचा कोरोनाचा कर्व्ह हा सपाट होऊ लागला होता. त्यानंतर १४ एप्रिलला चाचण्यांचा वेग ६९ टक्के तर १९ एप्रिलला ही टक्केवारी ५७ टक्क्यांवर आली आहे.

जर सरकारकडून कमीत कमी चाचण्या घेतल्या जात असतील तर कोरोना साथ पसरत आहे की नाही हा शोधण्याचा एकमेव मार्ग जेवढ्या चाचण्या घेतल्या गेल्या त्यातील किती जणांना कोरोनाची लागण झाली, हा शिल्लक राहतो. जेव्हा कोरोनाच्या देशात चाचण्या झाल्या नव्हत्या तेव्हा २० मार्चला ही टक्केवारी १.३३ टक्के होती तर १९ एप्रिलला ही आकडेवारी वाढून ४.५९ टक्के इतकी झाली. म्हणजे चाचण्यांची संख्या वाढल्यानंतर ही आकडेवारी वाढलेली दिसून आली.

गेल्या आठवड्यात नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण अन्य देशांच्या तुलनेत कमी आढळल्याचे म्हटले होते. भारतात १५ एप्रिलपर्यंत ४.७ टक्के तर याच काळात अमेरिकेतील आकडेवारी १७ टक्के असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

पण कांत यांनी अन्य देशांच्या तुलनेत लोकसंख्येच्या प्रमाणात भारताने कमी चाचण्या घेतल्या यावर प्रकाश टाकला नाही.

कोरोना संसर्ग किती प्रमाणात पसरला याचा एक निर्देशक म्हणजे या साथीत किती जणांना याची लागण झाली व त्याने किती लोक मरण पावले याची संख्या. अमिताभ कांत यांनी भारतात कोरोना मृत्यूची टक्केवारी ०.५ टक्के इतकी सांगितली.

पण काही कारणाने कांत यांनी जगाचे चित्र उलगडून दाखवले नाही. १ मे रोजी जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने भारतातील कोरोना मृत्यू दराची आकडेवारी सांगितली. त्यांच्यानुसार १०० कोरोना बाधित रुग्णांमध्ये ३.३ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. ही संख्या अन्य युरोपिय देशांपेक्षा विशेषत: जर्मनीपेक्षा (४.१ टक्के) कमी आहे. पण पाकिस्तान (२.३ टक्के), बांगलादेश (२.१ टक्के) पेक्षा अधिक आहे.

प्रशांत किशोर यांनी कोरोना चाचण्यांसंदर्भात आणखी एक ट्विट केले होते. त्यात ते म्हणतात, २० मार्च ते २९ एप्रिल दरम्यान केलेल्या चाचण्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण १७२ पटीने व मृत्यूचे प्रमाण २६८ पटीने वाढले आहे.

जेएनयूमधील सेंटर फॉर सोशल मेडिसीन अँड कम्युनिटी हेल्थ विभागातील रितू प्रिया या प्रशांत किशोर यांच्या पेक्षा अधिक स्पष्टपणे देशातील कोरोना परिस्थिती सांगतात. त्या म्हणतात, सरकारकडून दिली जाणारी आकडेवारी अर्थहीन आहे. चाचण्यामुळे पाळत ठेवता येते. झोननुसार चाचण्या घेण्याची गरज आहे. आता खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांची परवानगी दिली आहे आणि त्यातून मिळणारी आकडेवारी मुख्य आकडेवारीत मिसळली जात आहे. त्याने आकडेवारीत गफलत होत आहे. जो कोणी स्वत:च्या प्रकृतीबद्दल चिंताक्रांत असतो तो कोरोनाची चाचणी करून घेत असतो, असे रितू प्रिया यांचे म्हणणे आहे.

त्यांचे म्हणणे नेमके कसे आहे ते समजून घेऊया, २४ एप्रिलनंतर कोरोना पॉझिटिव्हची टक्केवारी झपाट्याने खाली येऊ लागली. १९ एप्रिलला आकडा ४.५९ टक्के होता तो २९ एप्रिलला ४.२९ टक्के इतका घसरला. सरकारने ४ एप्रिलला खासगी प्रयोगशाळांना कोरोना चाचणीची परवानगी दिली होती. या परवानगी नंतर आकडेवारीत घसरण दिसू लागली.

सध्या परिस्थिती अशी आहे की कोरोना साथ आता समुदाय स्वरुपाची होत आहे आणि तसे संकेत आयसीएमआरने एप्रिल महिन्याच्या आपल्या एका रिपोर्टमध्ये दिले होते. आयसीएमआरने १०२ रुग्णांचा अभ्यास केला. त्यातील ३९ टक्के रुग्णांनी परदेश प्रवास केला नव्हता. २ टक्के रुग्णांचा थेट संपर्क कोरोना बाधितांशी आला होता. १ टक्के रुग्णांचा संपर्क परदेशातून नुकतेच आलेल्या प्रवाशांशी झाला होता. तर ५७.९ टक्के रुग्णांना कशी कोरोनाची लागण झाली याची माहिती मिळालेली नाही.

एकूण चित्र स्पष्ट दिसतेय.

मीतू जैन, या नवी दिल्लीस्थित मुक्त व शोधपत्रकार आहेत.

.मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: