भारत-पाक जोडप्यांमधील दुरावा संपला

भारत-पाक जोडप्यांमधील दुरावा संपला

गेले दोन वर्षे तणावामुळे बंद असलेली भारत-पाकिस्तान दरम्यानची व्हिसा सेवा सुरू झाली आहे. पाकिस्तानातील भारतीय दुतावासाने व्हिसा अर्ज स्वीकारण्यास सुरूव

६ वर्षे चाललेले एक शेतकरी आंदोलन!
करोना थकून मरावा, माणसं जिवंत रहावीत
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग, ५ जणांचा मृत्यू

गेले दोन वर्षे तणावामुळे बंद असलेली भारत-पाकिस्तान दरम्यानची व्हिसा सेवा सुरू झाली आहे. पाकिस्तानातील भारतीय दुतावासाने व्हिसा अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. या निर्णयात केवळ विमान प्रवासाला मंजुरी देण्यात आली असून मर्यादित कालावधीचे व्हिसा दिले जाणार आहेत, असे दुतावासाने स्पष्ट केले आहे.

व्हिसा अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाल्याने राजस्थानातील बारमेर जिल्ह्यातील खाजेड का पारमधील महेंद्र सिंग यांच्या चेहर्यावर आनंद दिसून आला. महेंद्र सिंग यांचे जानेवारी २०१९मध्ये पाकिस्तानातील छगन कुंवर, या सोधा राजपूत जातीतील मुलीशी लग्न झाले होते.

पण २ वर्षांपूर्वी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्याने दोन्ही देशांनी व्हिसा अर्ज स्वीकारण्यास बंद केले होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील नागरिकांमधील संवाद पूर्णपणे बंद झाला होता. अनेक जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. काही जोडप्यांमध्ये घटस्फोटापर्यंत मजल गेली होती.

पाकिस्तानातले उमेरकोट येथील सोधा राजपूत समाजातील मुलींचे विवाह भारतातल्या राजस्थानातल्या सोधा राजपूत समाजातल्या मुलांशी करण्याची प्रथा आहे. या परंपरेनुसार भारतातील राजपूत मुले थर एक्स्प्रेसने पाकिस्तानात जातात. ही रेल्वे जोधपूर नजीक भगत की कोठी ते पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातील कराची कॅटोन्टमेंट अशी धावते.

एकदा विवाह झाल्यानंतर भारतात येण्यासाठी जोडप्यांचे व्हिसा अर्ज येत असतात.

पण पुलवामा हल्ल्याच्या दरम्यान भारत-पाकिस्तानामध्ये तणावाचे संबंध झाल्यानंतर अनेक पाकिस्तानी विवाहित मुलींना भारतात येण्यावर बंधने आली होती. दोन्ही देशात गेली दोन वर्षे संबंध तणावाचे राहिल्याने अनिश्चितता निर्माण झाली होती. त्यात कोविड-१९मुळेही व्हिसा प्रक्रिया खंडित झाली होती. आता मर्यादित काळासाठी व्हिसा अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाल्याने दोन्ही देशांमधील नागरिकांमधील संबंध पूर्ववत होऊ लागतील. जोडप्यांमध्ये झालेला दुरावा कमी होईल व नवे विवाह संबंध तयार होतील, अशी अपेक्षा आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0