पॉझिटीव्हीटी दर व ऑक्सिजन बेड उपलब्धतेवर निर्बंधांचा निर्णय

पॉझिटीव्हीटी दर व ऑक्सिजन बेड उपलब्धतेवर निर्बंधांचा निर्णय

मुंबई: पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे १४ जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधां

बिदाल आणि गोंदवले गावांनी निवडला कोरोनामुक्त मार्ग!
औषध साठेबाजीः गौतम गंभीरवर कारवाई होणार
करोना. विकलांग समाजावर रोगाचा हल्ला

मुंबई: पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे १४ जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर( लेव्हल्स) ठरवेल असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशान्वये कळविले आहे. सध्या राज्यात २०,६९७ ऑक्सिजन बेडवर रुग्ण असून ही संख्या ३५ हजारापेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही.

महाराष्ट्र शासनाने ४ जून रोजी जारी केलेल्या आदेशाद्वारे राज्याच्या विविध जिल्ह्यांतील भिन्न प्रशासकीय क्षेत्रांमध्ये संबंधित क्षेत्रातील कोव्हिड-19 पॉझिटीव्हीटीचा वेग आणि वापरात असलेल्या ऑक्सिजन सुविधायुक्त खाटा यांच्या आधारे लागू करण्यात येणाऱ्या बंधनांच्या स्तरांविषयी निर्देश दिले आहेत.

सदर आदेशातील अनुच्छेद चार मध्ये राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणाची व्याख्या दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० जून २०२१ रोजी संपूर्ण राज्यात रुग्णांद्वारे वापरात असलेल्या ऑक्सिजनयुक्त खाटांची एकूण संख्या २०,६९७ इतकी असून ही संख्या घट दर्शवणारी आहे. ही संख्या ३५ हजारपेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0