उ. प्रदेशात २० नागरिकांना दोन वेगळ्या लसी

उ. प्रदेशात २० नागरिकांना दोन वेगळ्या लसी

सिद्धार्थनगरः उ. प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात कोविड-१९ प्रतिबंधित लसीकरण मोहिमेत २० हून अधिक व्यक्तींना वेगवेगळ्या लसी (कॉकटेल) दिल्याची घटना घडल

देशात २१ हजार शिबिरात साडे सहा लाख स्थलांतरित
न्यूझीलंडमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात?
गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे

सिद्धार्थनगरः उ. प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात कोविड-१९ प्रतिबंधित लसीकरण मोहिमेत २० हून अधिक व्यक्तींना वेगवेगळ्या लसी (कॉकटेल) दिल्याची घटना घडली. या २० जणांना पूर्वी कोविशिल्ड लस दिली होती नंतर त्यांना दुसरा खुराक म्हणून कोवॅक्सिन ही लस देण्यात आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक आरोग्य सेवकांनी आपणाकडून ही चूक झाल्याचे मान्य केले आहे.

सिद्धार्थनगर जिल्हा नेपाळच्या सीमेलगत असून या जिल्ह्यातील बढनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आसपासच्या गावांचे लसीकरण सुरू आहे. या मोहिमेंतर्गत गेल्या १४ मे रोजी लसीचा दुसरा खुराक म्हणून अनवधनाने कोविशिल्ड ऐवजी कोवॅक्सिन लस २०हून अधिक नागरिकांना देण्यात आली. यातील एक व्यक्ती राम सूरत यांना ही माहिती कळताच ते भयभीत झाले आणि त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राशी लगेच संपर्क साधून चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर चूक एकमेकांवर ढकलण्याचे प्रसंग आरोग्य केंद्रात घडू लागले.

नंतर सिद्धार्थनगर जिल्ह्याचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संदीप चौधरी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर वेगवेगळ्या लसी देण्याचा बेजबाबदारपणा उघ़डकीस आला.

दरम्यान दोन वेगवेगळ्या लसी दिलेल्या एकाही व्यक्तीची प्रकृती गंभीर झाली नसल्याचे आढळून आले. सर्व व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.

वेगवेगळ्या लसींचा प्रभाव वेगळा

द वायर सायन्सने काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या लसी दिल्या संदर्भात स्पॅनिश अभ्यासगटाचे एक वृत्त दिले होते. त्यानुसार सुमारे ६०० व्यक्तींना पहिला खुराक फायझरचा दिल्यानंतर दुसरा खुराक कोविशिल्डचा देण्यात आला होता. या दोन वेगवेगळ्या लसीनंतर त्या व्यक्तींमध्ये कमालीची प्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचे आढळून आले होते.

दोन वेगवेगळ्या लसी दिल्यानंतर होणारे परिणाम काही औषध कंपन्यांकडून सुरू आहेत. दोन वेगवेगळ्या लसी दिल्यानंतर व्यक्तीला फायदा होतो की नाही याचा विचार भारतात एनटीएजीआयकडून सुरू असून त्या संदर्भातील शिफारशी त्यांच्याकडून आरोग्य खात्याकडे पाठवल्या जात असतात.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0