मुंबईः राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लीटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कर कपातीच
मुंबईः राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लीटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कर कपातीचा निर्णय १४ जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्य सरकारने जाणीवपूर्वक राज्यातील पेट्रोलच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर कपातीमुळे राज्यातील जनतेला महागाईपासून दिलासा मिळेल. या कर कपातीच्या घोषणेमुळे राज्यातील जनतेला ६ हजार कोटी रुपयांच्या करातून दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सरकारने करांमध्ये ५० टक्के कपात केली असती, तर खऱ्या अर्थाने जनतेला दिलासा मिळाला असता, अशी टीका या निर्णयावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
COMMENTS