दिल्लीत विधानसभा निवडणुका ८ फेब्रुवारीला

दिल्लीत विधानसभा निवडणुका ८ फेब्रुवारीला

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणुका आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा सोमवारी केली. दिल्लीत येत्या ८ फेब्रुवारी रोजी मतदान होईल तर ११ फेब्रुवारीला

बहुमताची वाटचाल सामाजिक वीण उसवण्याकडे
शेतकरी मागण्यांवर ठाम, आंदोलन चिघळले
अमित शहांकडून दिल्ली पोलिसांचे कौतुक, पण वास्तव वेगळेच

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणुका आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा सोमवारी केली. दिल्लीत येत्या ८ फेब्रुवारी रोजी मतदान होईल तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. हे मतदान एकाच टप्प्यात घेतले जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. दिल्ली विधानसभेची मुदत येत्या २२ फेब्रुवारी संपत आहे.

दिल्लीत ७० विधानसभा जागा आहेत आणि त्यातील १२ जागा अनु. जातींसाठी राखीव आहेत. दिल्लीत मतदारांची संख्या १ कोटी ४६ लाख असून यात पुरुष मतदार ८० लाख ५५ हजार तर महिला मतदार ६६ लाख ३५ लाख आहेत तर १३,७५० मतदान केंद्रे आहेत.

२१ जानेवारी रोजी उमेदवार आपले अर्ज दाखल करू शकतात. त्यानंतर २२ जानेवारी रोजी उमेदवार अर्जाची छाननी होणार असून २४ जानेवारीला उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात.

या एकूण मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ९० हजार निवडणूक कर्मचारी काम करणार आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0