नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी २३ वर्षीय पॅरामेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या निर्भयावर सामूहीक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी २३ वर्षीय पॅरामेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या निर्भयावर सामूहीक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या अक्षय ठाकूर सिंह, मुकेश, पवन गुप्ता व विनय शर्मा या ४ आरोपींची दिल्लीतील स्थानिक न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. आता या चौघांना येत्या २२ जानेवारी रोजी तिहार कारागृहात फाशी दिली जाणार आहे.
या फाशीच्या विरोधात अपील करण्यासाठी न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची मुदत दिली आहे. आरोपींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात लवकरच क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना निर्भयाच्या आईने आरोपींना फाशी दिल्याने महिलांचा कायद्यावर विश्वास वाढेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या मुलीला अखेर न्याय मिळाला आहे. या आरोपींना फाशी दिल्याने देशातील महिलांना ताकद मिळाली आहे. त्याने देशाच्या जनतेचा कायद्यावरील विश्वास वाढला आहे. २२ जानेवारी हा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा दिवस असेल, असेही त्या म्हणाल्या.
या ४ आरोपींना फाशी देण्यासाठी उ. प्रदेशातून जल्लादला २१ जानेवारी रोजीच तिहार कारागृहात आणले जाणार आहे.
मूळ बातमी
COMMENTS