स्वरा, हर्ष मंदेर प्रकरणात केंद्र, दिल्ली पोलिसांना नोटीस

स्वरा, हर्ष मंदेर प्रकरणात केंद्र, दिल्ली पोलिसांना नोटीस

नवी दिल्ली : सिने अभिनेत्री स्वरा भास्कर, हर्ष मंदेर, आरजे सायेमा, आपचे आमदार अमानुल्ला खान यांनी चिथावणीखोर भाषणे केल्याच्या आरोप करणारी याचिका न्याय

राजस्थान विधानसभा अध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयात धाव
निर्भया प्रकरण – ४ दोषींना २० मार्चला पहाटे फाशी
विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांना बंदी

नवी दिल्ली : सिने अभिनेत्री स्वरा भास्कर, हर्ष मंदेर, आरजे सायेमा, आपचे आमदार अमानुल्ला खान यांनी चिथावणीखोर भाषणे केल्याच्या आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल झाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी या संदर्भात केंद्र सरकार, दिल्ली सरकार व दिल्ली पोलिसांनी यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या संदर्भातील पुढील सुनावणी १३ एप्रिल रोजी न्या. पटेल व न्या. शंकर यांच्या पीठापुढे होणार आहे.

ही याचिका संजीव कुमार यांनी दाखल केली आहे. भारताला बदनाम करणारा अर्बन नक्षल गटाचा हा कट असून भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा अत्यंत मलीन करण्याचा या लोकांचा प्रयत्न असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. संजीव कुमार यांनी स्वरा भास्कर, हर्ष मंदेर, आरजे सायेमा, अमानुल्ला खान यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडूनही चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

संजीव कुमार यांनी दिल्ली दंगल घडण्यास कारणीभूत ठरलेल्या भाजपचे नेते कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, परवेश मिश्रा यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यास या याचिकेत विनंती केली आहे पण त्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडूनच्या चौकशीचा उल्लेख नाही. या नेत्यांना तत्काळ अटक करावी असे या याचिकेत म्हटले आहे. कपिल मिश्रा यांचे चिथावणीखोर भाषण व गोली मारो सालों को, जय श्रीराम या घोषणांचाही उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0