दिल्ली पोलिसांची काँग्रेस मुख्यालयात घुसून कार्यकर्त्यांना मारहाण

दिल्ली पोलिसांची काँग्रेस मुख्यालयात घुसून कार्यकर्त्यांना मारहाण

नवी दिल्लीः नॅशनल हेराल्ड प्रकरणात बुधवारी दिवसभर तिसऱ्यांदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू असताना काँग्रेस कार्यकर्ते व दि

सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीवर माजी न्यायाधीश, सनदी अधिकारी नाराज
महाराष्ट्रात लसीकरण अडचणीत
फेसबुकवरील जाहिरातीत भाजप आघाडीवर

नवी दिल्लीः नॅशनल हेराल्ड प्रकरणात बुधवारी दिवसभर तिसऱ्यांदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू असताना काँग्रेस कार्यकर्ते व दिल्ली पोलिस यांच्यात घमासान पाहायला मिळाले. दिल्ली पोलिसांनी ईडी कार्यालयाजवळ जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी बळाचा वापर केला तर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांनी थेट अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयात शिरकाव करून कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीचे व्हीडिओ सोशल मीडियात पसरल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची तीव्र लाट उमटली. दिल्ली पोलिस भाजपचे खासगी रक्षक असल्याचा आरोप काँग्रेसकडून झाला. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवासन यांना एक पोलिस लाथ मारत असल्याचे व्हीडिओत दिसून आले. त्याच बरोबर दिल्ली काँग्रेस प्रमुख अनिल चौधरी यांच्यासोबतही पोलिसांचे वर्तन आक्रमक होते. काँग्रेसच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांच्या मदतीला निमलष्करी दलाचे जवानही केंद्र सरकारने तैनात केले होते.

दिल्ली पोलिस व काँग्रेस कार्यकर्ते यांच्या संघर्षातील शेकडो फोटो ट्विटर, फेसबुक या सोशल मीडियातून व्हायरल होताना दिसले. गेल्या आठ वर्षांतला हा लोकशाहीसाठी सर्वात मोठा काळादिन असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसकडून आली. मोदी सरकारचे हे कृत्य सामान्य काँग्रेस कार्यकर्ता विसरणार नाही, असा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला.

दरम्यान गेल्या तीन दिवसात सुरू असलेल्या घटनाक्रमानंतर काँग्रेसने गुरुवारी देशातील सर्व राजभवनांना घेराव घालण्याची घोषणा केली आहे. आमचा हा घेराव दिल्ली पोलिसांच्या कृतीचा निषेध असून राहुल गांधी व काँग्रेसचा आवाज दडपण्यासाठी मोदी सरकार सर्व पद्धतीने प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

राहुल गांधींना शुक्रवारीही बोलावले

ईडीने बुधवारी दिवसभर राहुल गांधींची चौकशी केली. नॅशनल हेराल्ड प्रकरणातील सलग तीन दिवस ही चौकशी सुरू असून शुक्रवारीही त्यांना बोलावण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0