नवी दिल्लीः दिल्ली दंगलीसंदर्भात सुमारे १७,५०० पानांचे आरोपपत्र बुधवारी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दाखल केले. या आरोपपत्रात १५ आरोपींना दिल्ली दंगलीस
नवी दिल्लीः दिल्ली दंगलीसंदर्भात सुमारे १७,५०० पानांचे आरोपपत्र बुधवारी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दाखल केले. या आरोपपत्रात १५ आरोपींना दिल्ली दंगलीसाठी जबाबदार ठरवण्यात आले असून त्यांच्यावर यूएपीए लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. यात ७४५ जणांच्या साक्षी आहेत.
दिल्ली दंगलीला कारणीभूत ठरलेल्या भाजप नेता कपिल मिश्रा यांच्या चिथावणीखोर भाषणाबाबत मात्र दिल्ली पोलिसांनी बचावाची भूमिका घेतली आहे. दिल्ली दंगलीमागे सीएएसमर्थक असल्याचा प्रचार केला गेला पण पोलिस तपासात तसे अद्याप काही सापडले नसल्याचे पोलिस उपायुक्त (विशेष कक्ष) प्रमोद सिंग कुशवाहा यांनी सांगितले.
या १५ आरोपींच्या यादीत जेएनयूतील माजी विद्यार्थी नेता उमर खालिद व शारजील इमाम यांची नावे नसली तरी पुरवणी आरोपपत्रांमध्ये या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ आरोपींमध्ये एक आरोपी सफुरा झरगर सध्या जामीनावर आहे.
दिल्ली दंगल एक सुनियोजित कट होता. दंगलीच्या भागात ट्रॅफिक जॅम एकाचवेळी सुरू झाला. ही बाब दंगलीमागे एक कारस्थान असल्याचे सूचित करत असल्याचे कुशवाहा यांनी सांगितले.
आरोपपत्रात पुरावे म्हणून व्हॉट्स अप चॅट, सीडीआर यांचीही नोंद घेण्यात आली आहे.
मूळ बातमी
COMMENTS