दिल्ली दंगलः माजी न्यायाधीशांची स्वतंत्र चौकशी समिती

दिल्ली दंगलः माजी न्यायाधीशांची स्वतंत्र चौकशी समिती

नवी दिल्लीः गेल्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतील ईशान्य भागात झालेल्या दंगलीची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी न्यायव्यवस्थेत आणि केंद्र-राज्यात प्रशासकी

देवांगना, नताशा आणि ‘पिंजरा तोड’च्या सदस्यांना एक निरोप !
संवेदनाशून्य तपास; दिल्ली पोलिसांना २५ हजाराचा दंड
उमर खालिदचा जामीन फेटाळला

नवी दिल्लीः गेल्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतील ईशान्य भागात झालेल्या दंगलीची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी न्यायव्यवस्थेत आणि केंद्र-राज्यात प्रशासकीय कामात आपले उल्लेखनीय योगदान दिलेल्या निवृत्त न्यायाधीश व सनदी अधिकार्यांनी कॉन्स्टिट्यूशनल कंडक्ट ग्रुप (सीसीजी) स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकूर हे भूषवणार असून या समितीत दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ए.पी. शहा, दिल्ली उच्च न्यायालयातील निवृत्त न्या. आर. एस. सोढी, पटना उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. अंजना प्रकाश, माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई व ब्युरो ऑफ पोलिस अँड डेव्हलमेंटचे माजी महासंचालक मीरा बोरवणकर यांचा समावेश आहे.

या समितीकडून दिल्ली दंगलीची झालेली पोलिस चौकशी व अन्य यंत्रणांनी केलेली चौकशी याचा लेखाजोखा करणार आहे. दिल्ली दंगलीची ज्या पद्धतीने चौकशी केली जात असून त्यावर या माजी प्रशासकीय अधिकार्यांनी व निवृत्त न्यायाधीशांनी या पूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली दंगलीची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपली समिती काम करणार असल्याचे सीसीजीने म्हटले आहे.

ही समिती बिगर राजकीय गट असून घटनात्मक मूल्यांची जपणूक व्हावी हा या समितीच्या स्थापनेमागचा मूळ उद्देश आहे. पण ही समिती दिल्ली दंगल घडण्यापूर्वीची परिस्थिती व नंतरची परिस्थिती, पोलिसांचा तपास, हिंसाचारातील पीडित कुटुंबिय, कायदा व सुव्यवस्था, राज्याची यंत्रणा, मीडियाची भूमिका यांची चौकशी करणार आहे. ही समिती दिल्ली दंगलीचा पूर्ण अहवाल १२ आठवड्यात सादर करणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0