देवेंद्र मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

देवेंद्र मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

आज सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.

स्वर्गीय नर्तकाच्या पिल्लांचे पुनर्वसन
लॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार
युतीसाठी मायावतींशी संपर्क साधला पण त्यांनी दुर्लक्ष केलेः राहुल गांधी

आज सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. अतिशय गोपनीय ठेवण्यात आलेला हा शपथविधी आज सकाळी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून फडणवीस आणि पवार यांचे अभिनंदन केले.

गेल्या २५ दिवसांपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठका होत होत्या, मात्र कोणताही निर्णय झाला नाही. शिवसेनेसोबत जाण्याचा कोणताही निर्णय काँग्रेस घेऊ शकली नाही. त्यामुळे चर्चांना कंटाळून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाल्याचे वृत्त आहे.

आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. आम्ही राज्यपालांकडे दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे याबाबत माहिती देऊन आज आम्हाला शपथविधीसाठी बोलावले. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहू आणि स्थिर सरकार देऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल्याचे वृत्त आहे.

कोणी तरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नव्हते, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी म्हंटल्याचे वृत्त आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: