फडणवीस यांचे मुख्यमंत्री आणि देशमुखांवर गंभीर आरोप

फडणवीस यांचे मुख्यमंत्री आणि देशमुखांवर गंभीर आरोप

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. फडणवीस या

फडणवीसांच्या नजरेखाली राज्यात ‘व्यापम’सदृश घोटाळा
बाबरी पाडण्यासाठी करसेवा केल्याचा फडणवीसांचा दावा
फडणवीसांकडे गृह, लोढांकडे महिला बालविकास; बंडखोर गटाकडे कमी महत्त्वाची खाती

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले.

फडणवीस यांचे आरोप

  • अनिल देशमुख हे फेब्रुवारी महिन्यात १५ तारखेनंतर एका खाजगी विमानाने मुंबईमध्ये आले.
  • देशमुख मुंबईमध्ये बैठका घेत होते. त्यामुळे देशमुख यांना सचिन वाझे फेब्रुवारी अखेरीस भेटले नाही, हे म्हणणे चुकीचे.
  • शरद पवार यांना चुकीची माहिती दिली दिली जात आहे.
  • २५ ऑगस्ट २०२० रोजी तत्कालीन गुप्तवार्ता आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यां संदर्भात एक अहवाल तयार केला.
  • या अहवालात अनेकांचे फोन टॅप केलेले आहेत. बदल्यांचे रॅकेट चालवले जात आहे. यामध्ये अनेक मोठे अधिकारी आणि राजकीय नेत्यांची नावे आहेत.
  • ६.३ जिबीची ही माहिती असून, ती माहिती शुक्ला यांनी तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी २६ ऑगस्ट २०२० ला ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली.
  • मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावर काहीच कारवाई केली नाही उलट ही माहिती गृहमंत्र्यांकडे पाठवली.
  • रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना बढती देण्याऐवजी त्यांच्यासाठी अस्तित्त्वात नसलेले एक पद सिव्हील डीफेन्स महासंचालक तयार करण्यात आले. या पदाला राज्य मंत्रीमंडळाची मंजूरी नव्हती.
  • नंतर शुक्ला आणि जयस्वाल यांनी महाराष्ट्र सोडून केंद्राच्या सेवेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
  • आपण आजच दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार असून, त्यांच्याकडे सीबीआय चोकाशीची मागणी करणार आहोते, असे फडणवीस यांनी सांगितले.

हे आरोप बिनबुडाचे आणि ऐकीव माहितीवर आधारीत असल्याची प्रतिक्रिया कॉँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिली आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे.

“विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीला आधारच नाही”, असे म्हणत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार् यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय दिले आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन देशमुख यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता. आज सोमवारी  पवारांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांच्या पत्रावर काही प्रश्न उपस्थित केले आणि अनिल देशमुख यांना अभय दिले.

“ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात होते. मग सचिन वाझे देशमुखांना कधी भेटले?”, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.

त्यानंतर आज फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. बदल्यांचे रॅकेट हे गुहविभागाला लाजिरवाणे असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0