अधिक रेशनसाठी २० मुलांना जन्म द्यायचाः रावत

अधिक रेशनसाठी २० मुलांना जन्म द्यायचाः रावत

नवी दिल्लीः काही दिवसांपूर्वी महिलांनी फाटक्या जीन्स घालू नये असे वादग्रस्त वक्तव्य करणारे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत यांनी रविवारी पुन्हा

कार्यकर्त्यांच्या राज्यशासनाला सूचना
भाजपने सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले
तोक्ते चक्रीवादळ; पूर्ण खबरदारी घेतलीः मुख्यमंत्री

नवी दिल्लीः काही दिवसांपूर्वी महिलांनी फाटक्या जीन्स घालू नये असे वादग्रस्त वक्तव्य करणारे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत यांनी रविवारी पुन्हा काही विधाने करून वाद निर्माण केला आहे. कोविड-१९च्या काळात ज्यांना २० मुले होती त्यांना सरकारकडून रेशनवरचे धान्य अधिक मिळाले. या कुटुंबांवर मुलांची संख्या कमी असलेली कुटुंबे जळफळाट करत असतील. असा जळफळाट करण्यापेक्षा कमी मुले असलेल्या कुटुंबांनी अधिक मुलांना जन्म द्यायला हवा होता, आपली चूक झाली हे त्यांनी मान्य करावे, असे वादग्रस्त विधान रावत यांनी केले.

रविवारी नैनिताल येथे आंतरराष्ट्रीय वन दिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात तिरथ सिंग रावत यांनी वरील विधान केल्यानंतर आणखी एक बेछुट विधान केले. भारतावर अमेरिकेने २०० वर्षांहून अधिक काळ राज्य केले, पण कोरोनात अमेरिकेची सध्याची परिस्थिती किती दयनीय झाली आहे, ते पाहा असे  इतिहासाचे विपर्यास्त करणारे विधान त्यांनी केले.

कोविड-१९च्या काळात सरकारी धान्य वितरणाच्या योजनेवर बोलत असताना तिरथ सिंग रावत यांनी राज्य सरकारने कोविड-१९ची झळ बसलेल्या सर्व कुटुंबांना दरमहा प्रतिमाणशी ५ किलो धान्य दिले होते. ज्यांना १० मुले होती त्यांच्या घरी ५० किलो धान्य गेले. २० मुले असलेल्यांच्या घरात एक क्विंटल धान्य गेले पण दोन मुले असलेल्यांना केवळ १० किलो एवढेच धान्य मिळाले. याचा दोष तुम्ही कोणाला द्याल. तुम्हाला यांचा जळफळाट वाटत असेल. पण तुम्हाला वेळ होता तेव्हा २ मुले जन्माला घालण्याऐवजी त्यावेळी २० मुलांना का जन्म दिला नाही, असा सवाल रावत यांनी उपस्थितांना उद्देशून केला. कोविडच्या काळात लोकांनी दुकाने बांधली, त्यांना ग्राहक मिळाले, असाही दावा त्यांनी केला.

पुढे आपल्या भाषणात रावत यांनी, भारत २०० वर्षे अमेरिकेच्या गुलामगिरीत होता, असेही विधान केले. अमेरिकेचे सर्व जगावर राज्य होते. त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य अस्त पावत नव्हता. पण हा देश आता जगण्याची धडपड करत आहे, असे ते म्हणाले.

रावत यांच्या अशा विधानावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींना उद्देशून, त्यांनीच असे ज्ञानी प्रतिभा असलेले रत्न निवडले आहे, अशी कोपरखळी मारली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0