डॉ. आंबेडकरांवरचा दुर्मिळ माहितीपट सोशल मीडियावर

डॉ. आंबेडकरांवरचा दुर्मिळ माहितीपट सोशल मीडियावर

मुंबई: संविधान दिनानिमित्त ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर २६ नोव्हे

निषेधाचा अधिकार घटनात्मक; २ यूएपीए आरोपींना जामीन
भारतीय राज्यघटना आणि चित्रपट
भाजपने नुकसान केले, पण अनपेक्षित चमत्कारही घडवले

मुंबई: संविधान दिनानिमित्त ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता एकाच वेळी प्रसारण करण्यात येणार आहे.

डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेच, लाइव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या १६ मिनिटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्ताऐवज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केला होता.

या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. तर जी.जी. पाटील यांनी चित्रपटाचे संकलन केले आहे.

हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते.

महापुरुष डॉ.आंबेडकर यांची जीवनागाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी तसेच या दुर्मिळ माहितीपटास पाहता यावे यासाठी याचे प्रसारण करण्यात येत असल्याचेही महासंचालनालयामार्फत कळविले आहे.

मुंबई विभागाअंतर्गत महासंचालनालयाच्या

यूट्यूब- https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर- https://twitter.com/MahaDGIPR या लिंकवर हा माहितीपट पाहता येईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0