कोरोनावर लढणारे ‘डायसन’व्हेंटिलेटर एप्रिलमध्ये येणार

कोरोनावर लढणारे ‘डायसन’व्हेंटिलेटर एप्रिलमध्ये येणार

लंडन : जगप्रसिद्ध अब्जाधीश जेम्स डायसन यांच्या डायसन कंपनीने १० दिवसांत नव्या रचनेचा ‘कोव्हेंट’ व्हेटिंलेटर तयार केला असून ब्रिटनच्या सरकारने १० हजार व्हेंटिलेटरची ऑर्डर या

जेम्स डायसन CNN

जेम्स डायसन CNN

कंपनीला दिली आहे. सीएनएनने हे वृत्त दिले असून कंपनीचे मालक जेम्स डायसन यांनी हे वृत्त खरे असल्याचे सीएनएनला सांगितले आहे. डायसन कंपनीकडून १५ हजार व्हेंटिलेटर एप्रिलपर्यंत तयार होणार आहेत.

‘कोव्हेंट’ व्हेंटिलेटरचे उत्पादन कमी वेळेत होते, त्याचे उत्पादन अधिक संख्येने होऊ शकते आणि त्याची रचना कोरोना विषाणू बाधित रुग्णांसाठी खास करून तयार करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हे व्हेंटिलेटर जगभरात गरजू रुग्णांना वेळेवर मिळावेत म्हणून डायसन कंपनी येत्या एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यात हे व्हेंटिलेटर बाजारात आणण्याचे प्रयत्न करत आहे. पहिले ५ हजार व्हेंटिलेटर हे जगभरातील गरजू देशांना मोफत देण्यात येतील असे जेम्स डायसन यांनी सांगितले. जेम्स डायसन यांची मालमत्ता सुमारे १० अब्ज डॉलर एवढी आहे.

मूळ बातमी

COMMENTS