आम्ही कोरोना विषाणू पसरवला नाही : चीनचे स्पष्टीकरण

आम्ही कोरोना विषाणू पसरवला नाही : चीनचे स्पष्टीकरण

बीजिंग : आम्ही कोरोना विषाणू तयार केलेला नाही किंवा तो पसरवला नाही, या विषाणूला जाणूनबुजून ‘चिनी व्हायरस’ किंवा ‘वुहान व्हायरस’ म्हटले जात आहे, असे सं

Tik Tok सह ५९ चिनी ऍप्सवर बंदी
‘वडिलांच्या स्वप्नांची पूर्ती’ : ७ शहीद जवानांच्या कथा
चीन-पाकच्या संयुक्त निवेदनावर भारताचा आक्षेप

बीजिंग : आम्ही कोरोना विषाणू तयार केलेला नाही किंवा तो पसरवला नाही, या विषाणूला जाणूनबुजून ‘चिनी व्हायरस’ किंवा ‘वुहान व्हायरस’ म्हटले जात आहे, असे संबोधणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया चीनने बुधवारी दिली आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे चीनचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असताना आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मात्र सामान्य चिनी नागरिकाविषयी अप्रचार केला जात असून चीन जे प्रयत्न करत आहे, त्याकडे जगाने पाहावे, असे चीनचे प्रवक्ते जी रोंग यांनी आवाहन केले आहे.

आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने चीन व वुहान विषाणू यांचा संबंध चुकीचा लावला जात असल्याचे म्हटले आहे, तरीही काही टीकाकार चीनला लक्ष्य करत आहेत. पण सामान्य चिनी माणसाकडून या महासाथीला रोखण्याचे जे शर्थीचे प्रयत्न आहेत, त्यांनी जे बलिदान दिले आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे टीकाकार आरोग्य व मानवतेच्या दृष्टिकोनातून  चीनचे प्रयत्न पाहात नाहीत, अशी प्रतिक्रिया चीनने दिली आहे.

चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला ही बाब खरी आहे पण हा विषाणू चीनमधूनच आला याचा कोणताही पुरावा अद्याप हाती आलेला नाही. कोरोना विषाणूची उत्पत्ती हा विज्ञान संशोधनाचा मुद्दा आहे आणि त्या दृष्टिकोनातून जगापुढे माहिती आली पाहिजे, असे चीनने म्हटले आहे.

परदेशातून आलेल्या प्रवाशांकडून लागण

गुरुवारी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य खात्याने चीनमध्ये बाहेरून आलेल्या प्रवाशांमुळे कोरोना विषाणू संसर्गाची काही प्रकरणे उघडकीस आल्याचे म्हटले आहे. अशी ६७ प्रकरणे असून पहिल्या दिवशी ४७ रुग्ण सापडले होते.

गेले काही दिवस हुबेई प्रांतातील वुहानमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही पण मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी हुबेईमध्ये सहा नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या ३,२८७ इतकी झाली असून ८१,२८५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान गेले नऊ आठवडे लॉक डाऊन असलेल्या वुहानमध्ये बुधवारी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच धोक्याचा इशारा कमी करून त्याची पातळी ‘मध्यम’ अशी केली आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0