मे मध्ये १० वर्षांतली सर्वाधिक महागाई नोंदवली

मे मध्ये १० वर्षांतली सर्वाधिक महागाई नोंदवली

नवी दिल्लीः खाद्य वस्तू व क्रूड ऑइलच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याने मे महिन्यात महागाईचा दर १५.८८ टक्क्यावर गेला होता. हा दर गेल्या १० वर्षातला सर्वाध

सरकारी मालमत्तांची घाऊक विक्री मोदींना महागात पडणार
‘२०२५ पर्यत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था अशक्य’
जीडीपीची घसरगुंडी आणि अर्थव्यवस्थेला बसलेली खीळ

नवी दिल्लीः खाद्य वस्तू व क्रूड ऑइलच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याने मे महिन्यात महागाईचा दर १५.८८ टक्क्यावर गेला होता. हा दर गेल्या १० वर्षातला सर्वाधिक असून गेल्या वर्षी मे महिन्यात महागाईचा दर १३.११ टक्के होता. गेले १४ महिने महागाईचा दर दोन अंकी राहिला आहे.

सरकारने महागाई कमी करण्याच्या घोषणा केल्या असल्या तरी प्रत्यक्षात महागाई वाढत चालल्याचे वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

मे महिन्यात महागाई वाढण्याचे कारण असे की या महिन्यात खाद्यतेल, क्रूड ऑइल, नैसर्गिक वायू, खाद्य वस्तू, धातू, अखाद्य वस्तू, रसायने व रासायनिक पदार्थांच्या दरात वाढ दिसून आली.

मे महिन्यात भाज्या, गहू, फळे व बटाट्यांच्या दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली होती. ही महागाई १२.३४ टक्के दिसून आली. मे महिन्यात भाज्यांच्या दरात महागाई ५६.३६ टक्के, गव्हात १०.५५ टक्के, अंडी, मांस, मासे यात महागाईचा दर ७.७८ टक्के इतका दिसून आला.

इंधनामध्ये महागाईचा दर ४०.६२ टक्के दिसून आला तर उत्पादित वस्तू व तेलबियामध्ये अनुक्रमे १०.११ टक्के व ७.०८ टक्के महागाई वाढली आहे.

क्रूड पेट्रोलियम व नैसर्गिक वायूच्या दरातील महागाई ७९.०५ टक्के वाढ झाली आहे.

मे महिन्यात घाऊक महागाईचा दर ७.०४ टक्के इतका दिसून आला असून रिझर्व्ह बँकेने जे उद्दिष्ट्य दिले होते त्यापेक्षा जास्त दिसून आला. सरकारचे हे पाचव्यांदा अपयश आहे.

गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने २०२२-२३ या काळात देशातील महागाईचा दर ६.७ टक्के इतका अपेक्षित धरला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0