‘येस बँके’चे संस्थापक राणा कपूर यांना अटक

‘येस बँके’चे संस्थापक राणा कपूर यांना अटक

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या ‘येस बँके’चे संस्थापक राणा कपूर यांना मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली रविवारी दुपारी ईडीने अटक केली. राणा कपूर त्यांनी केल

आरोग्य यंत्रणेवर लक्ष हवे; आमदारांचे मत
आव्हानांच्या विळख्यातील लोकशाही
कोविडमुळे बालविवाहही वाढण्याची भीती

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या ‘येस बँके’चे संस्थापक राणा कपूर यांना मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली रविवारी दुपारी ईडीने अटक केली. राणा कपूर त्यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची योग्य माहिती तपास यंत्रणांना देत नसल्याने त्यांना अटक केल्याचे समजते. राणा कपूर ११ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहतील.

दरम्यान, राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूर यांना त्या लंडनला जात असताना विमानतळावर रोखण्यात आले. त्यांची चौकशीही ईडीकडून केली जाणार आहे.

राणा कपूर येस बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात वाढती बुडीत कर्जे व थकीत बाकी यांमुळे बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळत गेली. तसेच येस बँकेचे व्यवस्थापनही ही परिस्थिती योग्य रितीने हाताळू शकली नाही, याचा तपास ईडी करणार आहे.

शुक्रवारी राणा कपूर यांच्या वरळीस्थित समुद्र महाल येथील घरांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती नंतर त्यांना मुंबईतील बॅलार्ड स्थित ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सुमारे २० तास चौकशी झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. रविवारी राणा कपूर यांना न्यायालयात नेले असता त्यांना तेथे रडू फूटले. मी सर्व माहिती देण्यासाठी तयार आहे. गेले अनेक दिवस आपण झोपलो नसल्याचे त्यांनी सांगितले.

ईडीच्या अधिकाऱ्यांकडून राणा कपूर यांच्या दिल्ली व मुंबईत राहणाऱ्या तीन मुलींकडूनही माहिती मिळवली जात आहेत.

ईडीच्या सूत्रांनुसार राणा कपूर यांची पत्नी बिंदू, मुली – राखी कपूर टंडन, रोशनी कपूर व राधा कपूर या आर्थिक घोटाळ्यात सामील असलेल्या काही कंपन्यांशी निगडित आहेत.

येस बँकेने दिवाण हाउसिंगला ६०० कोटी रु.हून अधिक रकमेचे कर्ज दिले होते पण नंतर त्याची थकबाकी वाढत गेली, त्या कर्जवाटपात राणा कपूर यांचा हात होता. त्याचबरोबर अनेक कंपन्यांना येस बँकेने कर्ज दिले होते, त्या कर्जबदल्यात राणा कपूर यांच्या पत्नीच्या खात्यात कर्ज दिल्याची बक्षिसी म्हणून काही रक्कम जमा केली जात होती.

उ. प्रदेशात ऊर्जा खात्याचा २,२६७ कोटी रु.चा भविष्य निर्वाह निधी घोटाळा झाला होता, त्यावेळी जी आर्थिक अनियमितता पुढे आली होती. यातील काही रक्कम दिवाण हाउसिंगमध्ये वर्ग करण्यात आली होती. त्याचा संबंध येस बँकेशी होता.

कोणत्याही एटीएम सेंटरवरून पैसे मिळणार

येस बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातून एप्रिल महिन्यापर्यंत केवळ ५० हजार रु.पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी मिळाली आहे. पण ही रक्कम खातेदार येस बँक अथवा अन्य कोणत्याही बँकेच्या एटीएममधून काढू शकतात असे येस बँकच्या व्यवस्थापनाने रविवारी जाहीर केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0